Letest News
सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय
अ.नगरशिर्डी

शिर्डीत श्री साईबाबा हॉस्पिटलला अत्याधुनिक संगणकीय साहित्याची साडेबारा लाखांची देणगी!

शिर्डी( प्रतिनिधी) मुंबई स्थित प्रिझमा ग्लोबल लिमिटेडचे संचालक आणि साईभक्त डॉ. श्रीराम आय्यर यांनी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाला PACS प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सुमारे साडेबारा लाख रुपये किमंतीचे अत्याधुनिक सर्वर, स्टोरेज आणि वर्कस्टेशन देणगी स्वरूपात प्रदान केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या संगणकीय उपकरणांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन श्री साईबाबा हॉस्पिटल येथे करण्यात आले. साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे आणि देणगीदार डॉ. श्रीराम आय्यर यांच्या हस्ते या सुविधा रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या. या प्रसंगी अमिताभ राय चौधरी, हरी जनार्दन, मयूर टोपर आणि रजत भोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.


या अत्याधुनिक संगणकीय उपकरणांमुळे PACS प्रणाली अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित होणार असून, वैद्यकीय डेटा दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल साईसंस्थानच्या वतीने डॉ. श्रीराम आय्यर यांचा साईबाबांची मूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात आला. संस्थान हॉस्पिटलला ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.


ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी साईसंस्थानच्या आयटी विभागाने घेतलेल्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या समर्पित योगदानामुळेच ही अत्याधुनिक प्रणाली यशस्वीरीत्या स्थापित होऊ शकली.


या प्रसंगी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे डॉ. उमेश व्यवहारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, आयटी विभागप्रमुख अनिल शिंदे, साईप्रसाद जोरी, सहाय्यक आधीसेविका मंदा थोरात, रुग्णालय जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण संगणकीय देणगीमुळे श्री साईबाबा हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी आणि अत्याधुनिक होणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button