
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीत राहणारे सावळे कुटुंबीयांनी संस्थान कर्मचारीसह राज्यातील गुंतवणूक धारकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता राहाता येथे गुन्हा दाखल झाला त्यानंतर शिर्डीला गुन्हा दाखल झाला होता

त्या गुन्ह्यात भूपेंद्र सह राजाराम सावळे सुबोध सावळे संदीप सावळे भाऊसाहेब थोरात यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील भूपेंद्रला अटक करून राहाता न्यायालयात हजर केले असता त्यास २५ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे
उर्वरित सर्व आरोपी फरार झालेले आहेत भूपेंद्र सोडून उर्वरित आरोपी हे श्री साईबाबा संस्थान मधील कर्मचारी होते आणि इतर संस्थान मधील कर्मचारींना गंडा घातल्याने संस्थानची बदनामी होत होती
म्हणून संस्थानचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी धाडशी निर्णय घेऊन ह्या चौघांना सेवेतून निलंबित केले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी दैनिक साईदर्शनला दिली आहे