Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
शिर्डी

पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू 

शिर्डी प्रतिनिधी शिर्डी साकुरी शिवाला राहत असलेल्या शैलेश देविदास सोळसे या तरुण मुलाचा गोदावरी कालव्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शैलेश २० मे २०२४ दुपारी ३ वाजता गोदावरी कालव्यात पोहण्यासाठी आला. त्याने कालव्यात पोहण्यासाठी उडी घेतली असता तो पाण्यातून वरच आला नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्याचे आई, वडील, भाऊ नातेवाईक यांनी सगळीकडे शोधाशोध केली. त्याचा कुठेच तपास लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गोदावरी कालव्याच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी महिला गेल्या असता त्यांना लोखंडी खांबाला असल्याचे अडकलेला पाण्यात सदर मुलाचा मृतदेह दिसून आला

kamlakar

त्यानंतर हा मृतदेह कोणाचा अशी चर्चा झाल्याने शैलेशच्या आई- वडिलांनाही या घटनेची माहिती मिळाली. शैलेशचे आई-वडील घटनास्थळी येऊन हा मुलगा आपलाच सांगून या मुलाचा असल्याचे सांगून घटनास्थळी आक्रोश केला. या घटनेची माहिती पोलीस पाटील सोमनाथ वाणी यांना देण्यात आली.

त्यांनी शिर्डी पोलिसांना माहिती दिली. शिर्डी पोलिसांनी सदर घटनेचा गुन्हा नोंदविला असून सदर घटनेमागील काय कारण आहे याचा ते शोध घेत आहेत. शैलेशच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button