Letest News
दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक
Blog

राकेश ओला साहेबांच्या आदेशाने राहाता येथे छापा टाकून कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी राहता येथे बिंगो नावाचा हरजितीचा जुगार विनापरवाना खेळ सुरू असल्याची पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी या बिंगो हारजितीच्या खेळाच्या ठिकाणी छापा टाकून हा खेळ खेळवणारे व खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून मोठा मुद्देमाल रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार राहता व शिर्डी येथे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शिर्डी राहता येथे बिंगो नावाचा जुगार खेळ सुरू असल्याचे समजले असता तेथे पंचांना घेऊन शिर्डी राहता येथे विविध ठिकाणी बिंगो जुगार खेळाच्या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून मोठी धडाकेबाज कारवाई केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


राहता येथील छत्रपती कॉम्प्लेक्स च्या तळमजल्यावरील गाळ्यांमध्ये हा बिंगो नावाचा जुगार सुरू असताना तेथे पोलिसांनी छापा टाकून सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत व एक लाख तीस हजार 650 रुपयाचा मुद्दामच जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राहता शहरातील वेशीजवळ बिंगो खेळ चालवणारे व खेळणारे अशा तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख 16 हजार शंभर रुपये मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातच आणखी दुसऱ्या छाप्यामध्ये छत्रपती कॉम्प्लेक्स गाळ्यामध्ये बिंगो जुगारयाच प्रकरणी चार जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 56 हजार चारशे रुपये मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राहता येथे आणखी एका छाप्यामध्ये तीन लोकांवर कारवाई करून 49 हजार 950 किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरात आणखी एका ठिकाणी छापा टाकून तीन लोकांवर कारवाई करण्यात आली असून बिंगो जुगार खेळत असणाऱ्या ठिकाणी रोख रक्कम व साहित्य असे एकूण 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . अशाप्रकारे पाच वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बिंगो जुगारावर छापे टाकले असून विविध साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे.

kamlakar


या छाप्यानंतर हा बिंगो जुगार चालवणारे तसेच मालक व खेळणारी यांच्या विरोधात राहता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 647 /648/ 649/ 650/ 651 /2023 नुसार मुंबई जुगार कायदा अधिनियम कलम 12 (अ ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ,श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर ,तसेच शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा व पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button