Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
क्राईमशिर्डी

शिर्डीत साई थीम पार्क जवळ फ्री फोटो काढतो म्हणून साईभक्तांची बाजूला ठेवलेली पर्स पळवून बहात्तर हजार रुपये सामानांची केली चोरी!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी मध्ये भामट्यांनी आता साई भक्तांची चोरी करण्यासाठी नवीन चोरीचा फंडा शोधून काढला असल्याचे दिसून येत आहे. असाच एक प्रकार शिर्डीत साई थीम पार्क जवळ घडला आहे. साई थीम पार्क जवळ फ्री फोटो काढतो असे सांगून पुण्याच्या साई भक्तांना हातातील सामान बाजूला ठेवण्यास सांगून फोटो काढण्याच्या नादी लावून खाली ठेवलेली पर्स पळवून नेऊन त्यामधील सामान चोरी गेली असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे येथील पिंपरी चिंचवड भागातील दिपा नरेंद्र पंजाबी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,दि. 16/04/2025 रोजी पहाटे 04/00 वाजणेचे सुमारास मी माझे पती व लहान मुलगा असे आम्ही श्री. साईबाबा समाधी मंदिर दर्शन करणे करीता शिर्डीत येथे आलो व साई सहारा हॉटेल शिर्डी येथे थांबलो होतो.


दि. 17/04/2025 रोजी सायंकाळी 05/00 वाजण्याचे सुमारास मी माझे पती व मुलगा असे आम्ही साई तिर्थ, थिम पार्क शिर्डी येथे शो पाहण्यासाठी गेलो. आम्हा पुन्हा आमचे राहते घरी पिंपरी चिंचवड पुणे येथे जाण्यासाठी रात्री 09/00 वाजणेचे सुमारास बस असल्याने आम्ही तेथुन शो बघुन रात्री 08/30 वाजणेचे सुमारास आम्ही साई तिर्थ थिम पार्क शिर्डी येथुन बाहेर निघत असतांना गेटजवळ एक अनोळखी इसम आमचे जवळ आला व तो म्हणाला की,

इथे तुमचा फॅमीली फोटो काढा, फोटो कॉपी फ्रि आहे. तुमचे सामाचे सामान येथे माझ्याजवळ ठेवा व चप्पल काढा असे म्हणाल्याने तेथे श्री. साई बाबांचे छोटे मंदिर असल्याने आम्ही तेथे समोर आमची चप्पल काढुन मी माझ्या हातातील पाण्याची पिशवी व पर्समध्ये 18000/- कॅश, एअरफोन, 1 plass, Nord 2T कंपनीचा मोबाईल फोन व कागदपत्र तेथे सदर अज्ञात इसमा जवळ ठेवले व फोटो काढण्यासाठी गेलो.

त्यानंतर आम्ही आमचे फॅमीली फोटो काढुन आमची चप्पल, पर्स, पाण्याची पिशवी घेण्यासाठी गेलो असता मला माझी पर्स दिसुन आली नाही. तसेच सदर अज्ञात इसम तेथे दिसुन आला नाही. म्हणुन आम्ही तेथे असलेल्या सेक्युरीटीजवळ चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघुन घ्या. आम्ही सीसीटीव्ही बघितल्यानंतर त्यामध्ये सदर अज्ञात इसम याने माझी पर्स उचलुन घेवुन जेन्ड्स वॉशरुमध्ये गेलेला दिसला.

त्यानंतर तेथील सेक्युरीट व माझे पती यांनी जेन्ड्स वॉशरुम मध्ये माझी पर्स मिळुन आली. व माझे पर्समधील काही सामान तेथे पडलेले होते. पर्स मधील 18000/- कॅश, एअरफोन, 1 plass, Nord 2T कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला नाही. सदर अज्ञात इसम याने पर्स चोरुन नेली असून पर्स मधील अठरा हजार रुपये रोख, 4000/- रुपये किंमतीचे आयपॅट कंपनीचे एअरफोन,व


50,000/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरी गेली असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला त्यांनी केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर
0388/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button