Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरशिर्डी

रिलायन्सचे उद्योगपती आकाश अंबानी व प्रसिद्ध क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांनी शिर्डीत घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मधील मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानींनी गेल्या पाच दिवसांपूर्वीच शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं होतं. यानंतर आज पुन्हा आकाश अंबानी यांनी आपल्या मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या समवेत शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत सूर्याकुमारची पत्नी देविशा शेट्टी देखील उपस्थित होती. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उद्या होणाऱ्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स विजयी होऊ दे म्हणून साई चरणी मनोमन प्रार्थना केली. ‌आयपीएल सामने सुरु झाल्यानंतर आयपीएल मधील मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीण निता अंबानी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं होतं.

तसंच त्यांनी साईबाबांच्या धुपाआरती व शेजाआरतीला हजेरी लावली होती. मुंबई इंडियन्स टीम विजयी झाल्यानंतर साईंचे आभार अंबानी यांनी मानत मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. त्यानंतर 22 एप्रिल रोजी रिलायन्‍स जियो इन्फोकॉम लिमिटेडचे अध्‍यक्ष व मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं होते.

यानंतर आता आज पुन्हा पाच दिवसानंतर आकाश अंबानी यांनी आपल्या मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या समवेत साईबाबांच्या दर्शनासाठी ते शिर्डीत आले होते त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरतीही केली. साईदर्शनानंतर अंबानी व सुर्यकुमार यादवनं साईबाबांच्या द्वारकमाई व गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

यावेळी मंदिर परिसरात असलेल्या म्युझियम मध्ये जाऊन साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या वस्तूंची पाहणी केली. यादरम्यान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आकाश अंबानी आणि फलंदाज सुर्यकुमार यादव तसंच पत्नी देविशा शेट्टी यांचा साई मूर्ती व शॉल देऊन सत्कार केला. याप्रसंगी साईबाबा मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button