Letest News
पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख... शिर्डी मतदारसंघात मतदारांची धक्कादायक घट ४० हजारांहून अधिक अर्ज जमा नाहीत! सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ...
Blog

शिर्डीत साईभक्तांसाठी नवीन वर्षात नो मास्क नो दर्शन नियम लागू होणार?

शिर्डी (प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

शिर्डी येथे नाताळ सुट्ट्या, श्री दत्त जयंती व सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांची मोठी गर्दी होत असून सध्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत .त्यामुळे साई संस्थांनने नो मास्क नो दर्शन हा नियम लागू करावा व साई भक्तांना मोफत मास्क पुरवावेत. अशा सूचना ना. विखे यांनी साई संस्थान प्रशासनाला दिल्या आहेत.

DN SPORTS

विखे. यांनी श्री दत्त जयंतीच्या दिवशी शिर्डीला भेट देत श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले .त्यानंतर साई संस्थान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ना. विखे. यांनी सध्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शिर्डीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी साई भक्तांची गर्दी लक्षात घेऊन साई भक्तांसाठी मास्क अनिवार्य करावा. नो मास्क नो दर्शन हा नियम संस्थांनने भक्तांसाठी लागू करावा व साई भक्तांसाठी साई संस्थान प्रशासनाने मोफत मास्क पुरवावेत. अशा सूचना त्यांनी संस्थान प्रशासनाला आज दिले आहेत.


सध्या नाताळ सुट्ट्या, श्री दत्त जयंती व सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त शिर्डीत साईभक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. अनेक साई भक्त हे स्वतःहून मास्क वापरतात. मात्र अनेकांना मास्क नसतो. देशात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत असल्यामुळे व शिर्डीत साई भक्तांची गर्दी ही वाढत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साई भक्तांना मास्क मंदिरात जाताना अनिवार्य करावेत. त्यासाठी साई भक्तांना मोफत मास्क संस्थानने द्यावेत. अशी महत्त्वाची सूचना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थान प्रशासनाला केली आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात साई भक्तांना नो मास्क नो दर्शन हा नियम लागू होणार आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button