Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
Blog

चहा व सिगारेटचे पैशे मागितले म्हणून चाकू हल्ला करणाऱ्या लक्ष्मीकांत शेजवळ याच्यावर गुन्हा दाखल

शिर्डी प्रतिनिधी /

sai nirman
जाहिरात

 शिर्डी शहरात शनिवार दिनांक १७  फेब्रुवारी रोजी  पहाटेच्या काकड आरती पूर्वी पहाटे ४  वाजेच्या सुमारास चहाचे पैसे मागतो का म्हणून एका चहा विक्रेत्यावर धारदार  शस्त्राने हल्ला हल्ला करण्यात आला होता साईबाबा मंदिराच्या समोरच गेट नंबर एक नगर मनमाड रोड लगत घटना घडल्याने शिर्डीत  खळबळ उडाली आहे तर काही वेळ साईभक्त देखील भयभीत झाले होते 
   बाळासाहेब मोकाटे या जखमी तरुणास  साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र त्याची  प्रक्रृत्ती गंभीर असल्याने  नगर येथे उपचारासाठी दाखल केले आहे अन्नासाहैब मोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि 
 माझा भाऊ  बाळासाहेब मोकाटे यास काही तरुणांनी चहा पिऊन सिगारेट मागितली व त्या चहा सिगारेटचे पैसे मागितल्याचा राग येऊन तरुणांनी  थेट चाकू हल्ला करत कानावर,हातावर व इतर ठिकाणी वार करत गंभीर जखमी केले भाऊ  रक्ताच्या  थारोळ्यात पडला… हल्ला करणारे  पसार झाले असून त्यातील एक हल्लेखोराला मार लागल्याने त्याला सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर तरुण इर्टिगा वाहनातून आले होते व या वाहनात बियर व दारूच्या  बाटल्या सुद्धा मिळून आल्या आहेत  सदर वाहन शिर्डी पोलिस स्टेशनने जप्त  केले आहे  आरोपी लक्ष्मीकांत देवानंद शेजवळ  ह्याच्यावर  गुन्हा रजिस्टर नंबर ८८/२०२४ भादवी
३०७  ५०४ ,५०६  प्रमाणे दाखल करण्यात आला आहे या तरुणावर या अगोदर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत .शिर्डी शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी,छोट्या छोट्या कारणांवरून थेट होणारे चाकू हल्ले,तरुणांमध्ये वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती पाहता पोलिस प्रशासनाने याकडे  गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची गरज आहे

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button