Letest News
नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
अ.नगरशिर्डी

श्रीरामपूरचे सुपुत्र माजी क्रिकेटपटू झहीर खान पत्नीसह साई चरणी नतमस्तक

शिर्डी (प्रतिनिधी)
भारताचा प्रसिद्ध मा.क्रिकेटपटू झहीर खान व सागरीका यांनी गुरुवारी शिर्डीला येऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू झहीर खान यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने साईमंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी क्रिकेटपटू झहीर खान पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आपले जन्मस्थानच शिर्डी जवळ श्रीरामपूरचे आहे. शिर्डीला पूर्वी क्रिकेट टूर्नामेंट खेळायला यायचो, त्यावेळेस दर्शनाला यायचो. शिर्डीत आता खूप बदल झाला आहे. हा बदल माझ्यासमोर होत गेला हे मी पाहिले आहे. माझ्याप्रमाणेच सागरीका साईभक्त आहे .ती नेहमी साई दर्शनाला येत असते.


शिर्डीला नेहमीप्रमाणे साई दर्शनाला आलो. साईबाबांकडे सगळ्यांचे चांगले होवो हीच प्रार्थना केली, दुवा मागितली. असे सांगत राजस्थानमधील एक सुशीला मीना नावाची मुलगी आपल्या ॲक्शन प्रमाणेच गोलंदाजी करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून ते बरोबर आहेत. सचिन तेंडुलकर यांनी ही या मुलीला सपोर्ट केला पाहिजे असे म्हटले आहे व माझेही हेच मत आहे. असे यावेळी झहीर खान यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button