Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
अ.नगरक्राईम

हॉटेल अशोका मध्ये घुसून दादागिरीने पैशे व दारू घेऊन मालकाला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल 

कोपरगाव शहरातील येवला रोडवर असलेल्या,’हॉटेल अशोका’मध्ये जाऊन तेथे असलेल्या बिअरच्या बाटल्या व तेथील गल्ल्यातील ०८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली त्यास विरोध केला असता फिर्यादिस हाताचे फाईटने मारून जखमी केल्या प्रकरणी गांधीनगर येथील आरोपी मोद्या उर्फ सागर रामदास मंजुळ याचे विरुद्ध फिर्यादी दिपक उद्धवदास वासवणी (वय-५२) रा.बँक कॉलनी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

कोपरगाव शहरातील गांधीनगर,सुभाषनगर,गट क्रमांक १०५ मध्ये काही असामाजिक तत्त्वांनी आणि काही उपनगरात भुरट्यांनी उपद्रव वाढवला असून पोलिसांना त्याची डोकेदुखी वाढली आहे.अशीच घटना नुकतीच येवला रोडवर असलेल्या,’हॉटेल अशोका’ येथे रविवार दि.१९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली असून यातील आरोपी मोद्या मंजुळ याने आपल्या काही साथीदारांना घेऊन तेथे प्रवेश केला होता व तेथे असलेल्या बिअरच्या बाटल्या मागितल्या होत्या.

kamlakar

बिअरच्या बाटल्या देत असताना आरोपीने फिर्यादी हे आपल्या काउंटरवर तेथील गल्ल्यातील रक्कम मोजत असताना त्याने सुमारे ०८ हजार ५०० रुपयांची रक्कम हिसकावून घेतली आहे.त्यास फिर्यादीचे विरोध केला असता त्यांना त्याने आपल्या हाताने फाईट मारून जखमी केले आहे.जाताना त्याने तेथील चार बिअरच्या बाटल्या हिसकावून पोबारा करत असताना त्यास विरोध केला असता त्याने शिवीगाळ करून फिर्यादिस चापटीने मारहाण करून बिलाची रक्कम न देता निघून गेला आहे.


दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी वासवणी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.२३६/२०२४ भा.द.वि.कलम ३२७,३२३,५०४,३४ प्रमाणे आरोपी व त्याचे सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button