Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
शिर्डी

श्री साईबाबा संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा

शिर्डी –
आधुनिक जीवनात निरोगी राहण्‍यासाठी योग साधना अत्‍यंत महत्‍वाची असल्‍याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने आयोजीत जागतीक योग दिन कार्यक्रमात श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने व्‍दारावती भक्‍तनिवास समोरील बागेत २१ जुन जागतिक योग दिन म्‍हणुन साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमास संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्र.उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई व संजय जोरी,शैक्षणिक संकुलांचे प्राचार्य, मुख्‍याध्‍यापक, अध्‍यापक, विद्यार्थी, संस्‍थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. योगाचार्य डॉ.तुषार शिसोदीया व डॉ नचिकेत वर्पे यांनी सर्वांना योग साधनेचे मार्गदर्शन करुन योगासने करुन घेतले.यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचेसह संस्‍थान अधिकारी, कर्मचारी शिर्डी ग्रामस्‍थ व विद्यार्थी यांनी सार्वजनिकरित्‍या योगासने केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button