Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरराजकीय

भारतीय हवामान खात्याचा इशारा-अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ ते २६ ऑक्टोंबर ‘यलो अलर्ट’

अहिल्यानगर, दि. २३ – भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ ते २६ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, या काळात सुरक्षिततेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे, असे सुचवले आहे.

sai nirman
जाहिरात

🌊 नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका

धरणातून पाण्याचा वाढलेला विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांनी घ्यावी खबरदारी

DN SPORTS

पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे वाहणाऱ्या नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
सध्या विसर्गाचे आकडे असे आहेत:

भिमा नदी (दौंड पूल) – २,७१७ क्युसेक

गोदावरी नदी (नांदूर मध्यमेश्वर धरण) – १,६१४ क्युसेक

जायकवाडी धरण – ३,१४४ क्युसेक

मुळा धरण – ५,०० क्युसेक

kamlakar

घोड धरण – १,०० क्युसेक

सीना धरण – १,०३० क्युसेक

हंगा नदी (विसापूर धरण) – १८६ क्युसेक

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पूर किंवा धोकादायक परिस्थितीत ताबडतोब सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.


⚡ सुरक्षिततेसाठी प्रशासनाचे निर्देश

विजा, वादळ, पावसाच्या वेळी खबरदारी घ्या; धोके टाळा

मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागी उभे राहू नये.

वीजेच्या संपर्कात येऊ नये; ट्रॅक्टर्स, मोटारसायकल, धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे.

होर्डिंग्ज किंवा जखमी/अस्थिर इमारतीजवळ राहू नये.

विजेच्या वेळी मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यावर बसून कान झाकावे, डोके गुडघ्यांमध्ये झाकावे, जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवावा.

नदी, ओढे, धरण आणि पूल परिसरात जाऊ नये; सेल्फी किंवा धोकादायक ठिकाणी फोटो घेऊ नयेत.

जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून संपर्क क्रमांक ०२४१-२३२३८४४ / २३५६९४० उपलब्ध आहेत.


🏔️ अतिरिक्त खबरदारी

भूस्खलन, दरडी कोसळणे, घाट रस्त्याचे धोके; जनावरांचे सुरक्षित स्थलांतर

अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याची शक्यता वाढते. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

घाट रस्त्याने प्रवास शक्यतो टाळावा.

जुनाट/मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.

जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.

सर्व नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button