Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

एक लाखाच्या खंडणीसाठी हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा  दाखल 

शिर्डी ( प्रतिनिधी )हॉटेल भाड्याने चालवायचे असेल तर महिन्याला एक लाख रुपये खंडणी द्यावी लागेल अशी अपहरण करून मागणी करणाऱ्यां खंडणी बहाद्दरांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

राहता तालुक्यातील निमगाव येथील नितीन भाऊसाहेब शहाणे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, आपण नगर मनमाड लगत असणाऱ्या सावळीविहीर येथील उल्हास काळे यांचे हॉटेल गारवा परमिट रूम, बियर बार हे गेल्या सहा महिन्यापासून भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेले असून
दि. 16/05/2025 रोजी सकाळी 10/00 वा. चे सुमारास मी ‌हे हॉटेल ऊघडून दिवसभर हॉटेलवरच थांबलेले होतो.

त्यानंतर रात्री 08/30 वा. चे सुमारास मी पायी माझ्या घरी निमगाव बायपास रोडने जात असतांना माझ्या पाठीमागुन एक पांढ-या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पीओ कार माझ्या जवळ आली व त्यातुन दोन अनोळखी इसम वय अंदाजे 35 ते 38 वर्षे वयाचे दरम्यान असणारे यांनी मला गाडीत बसवुन निमगाव को-हाळे रोडवरील हॉटेल गोटु का ढाबा

येथे घेवुन जावुन मला खाली उतरवुन मला ते दोन अनोळखी इसम म्हणाले की, तुला जर सावळीविहीर येथिल गारवा हॉटेल चालवायचे असेल तर तुला एका महीन्याला एक लाख रुपये द्यावे लागेल. अशी खंडणी मागीतली. त्यावर मी त्यांना ठिक आहे. असे बोललो असताही त्यांनी मला हाताने तसेच वायर रोप याने पाठीवर तसेच तोंडावर मारहाण करुन जखमी केले.

त्यावेळी आजुबाजुला राहणारे लोक जमा झाले. नंतर ते तेथुन पळुन गेले. त्यावेळी जमा झालेले लोकांपैकी मिनल गोंदकर, गोरख चक्रनारायण दोन्ही रा. निमगाव, अश्यांनी मला जखमी अवस्थेत शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणल्यानंतर मी जखमी अवस्थेत असल्याने तसेच मला त्रास होत असल्याने मला सचिन शेजवळ व मिनल गोंदकर यांनी मला साईबाबा हॉस्पीटल शिर्डी याठिकाणी औषधउपचारा करीता घेवुन गेले.

त्यावेळी मला स्कॉर्पीओ कारमध्ये घेवुन जाणारे व मारहाण करणारे यांची नावे 1) बनु मते 2) सागर पगारे दोन्ही रा. निमगाव ता. राहाता 3) आशिष रा. सावळिवीहर ता. राहाता असे असल्याचे समजले. ते दोघे पुन्हा साईबाबा हॉस्पीटल येथे येवुन मला शिवीगाळ केली व तेथून निघुन गेले.

त्यानंतर मला माझ्या हॉटेलचे मॅनेजर सुकान भोई यांनी माझ्या लहान भावाच्या मोबाईल फोनवर फोन करुन सांगीतले की, 1) बनु मते 2) सागर पगारे दोन्ही रा. निमगाव ता. राहता 3) आशिष रा. सावळीविहर ता. राहाता हे आपले हॉटेलवर आले होते व त्यांनी मला धमकी देवुन दोन रेडलेबल कंपनीची दारुच्या बाटल्या घेवुन गेले.

अशा आशयाची फिर्याद नितीन भाऊसाहेब शहाणे यांनी 1) बनु मते 2) सागर पगारे दोन्ही रा. निमगाव ता. राहाता 3) आशिष रा. सावळीविहीर ता. राहाता यांचे विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0541 /2025 नुसार


भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 प्रमाणे कलम
115(2) 118(1) 3 (5) 4 308 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री शिरीष वमने व पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button