Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरशिर्डी

शिर्डीत दिवसेंदिवस विविध कारणांमुळे भाविकांची रोडावत आहे गर्दी!

अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईंच्या शिर्डीत सध्या अर्थकरणाचं संकट उभं राहिलं असून अनेक व्यापारी चिंतेत सापडले आहेत, कारण शिर्डीत रामनवमी,गुरुपौर्णिमा, कृष्णाजन्माष्ठमी व विजयादशमी हे महत्वाचे उत्सव असतात आणि या उस्तावाला देश विदेशातून भाविक येत असतात परंतु गेल्या एक वर्षांपासून वरील उत्ववासाठी येणारी भाविकांची संख्या कमी झाल्याने मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डीत हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, फास्ट फूड, नॉवेल्टीज तसेच इतर छोटे मोठे व्यवसाय हे येथील अर्थाकरणाचा श्रोत आहे.हे सर्व व्यवसाय हे शिर्डीत येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहेत त्यामुळे साईभक्त हाच येथील अर्थाकरणाचा केंद्राबिंदू आहे. परंतु याचं भाविकांना मंदिरात समाधानाने दर्शन घेता येत नाही कारण भाविक आणि बाबांच्या दर्शनामध्ये काचेचा अडथळा आहे

त्यामुळे अनेक भाविक नाराज होऊन परतीच्या प्रवासाचा निर्णय घेतात त्यामुळे साई संस्थांनने एक विशेष बाब म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरी बाब म्हणजे येथील दुकानदार व एजेंट यांच्या कडून भाविकांना मिळत असलेली वागणूक, कारण अनेक भाविकांना नको त्या वस्तू पूजेच्या नावाखाली माथी मारल्या जातात,

कधी झटपट दर्शनाचे आमिष, कधी व्हीआयपी पासेस अव्वा ते सव्वा भावात एजेंट मार्फत विक्री होणारे प्रकार, तर कधी पूजेच्या साहित्यात केवळ कमिशनच्या नादात भाविकांची सुरु असलेली फसवणूक व लुट, भाविकांना होणारी मारहाण, दादागिरी तसेच वाढती गुन्हेगारी

याप्रकारामुळे देश विदेशात भाविकांमध्ये नाराजी असून त्यामुळे साई संस्थांनचे व शिर्डीचे नाव दिवसेंदिवस बदनाम होत आहे व त्याचाच परिणाम शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर झाला असून त्याचा मोठा आर्थिक फटका येथील बाजारपेठेला व व्यापाऱ्यांना बसला आहे. यासाठी सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तर साई संस्थान प्रशासनाने साईबाबांचा प्रचार व प्रसार याकडे सर्वात जास्त लक्ष देऊन देश विदेशात मोठी मोहीम राबविण्याची गरज आहे.

अर्थात यासर्व बाबी वेळोवेळी निदर्शनास आणून देऊनही त्याबाबत कोणीही गांभीर्याने पहात नसल्यानेच आजरोजी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची गर्दी कमी झाली आहे असे अनेक स्थानिक जेष्ठ ग्रामस्थांचे मत आहे.शिर्डीत येणारा प्रत्येक भाविक हा आपल्या दृष्ठीने साईबाबाचं आहे, त्यांना दर्जेदार वस्तू देणे, त्यांच्याशी आपुलकीने वागणे,

त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांना चांगले मार्गदर्शन व माहिती देणे यासर्व बाबींचे अनुकरण करून अंमलबजावणी केली तरच भाविक शिर्डीत येण्याचा व राहण्याचा विचार करेल नाही तर भविष्यात भाविकांची संख्या आणखी घटण्याची शक्यता नाकारून चालणार नाही.


शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी वाढती गुन्हेगारी, वाढते गुन्हेगारांचे प्रमाण, अवैध व्यवसायांचा पडलेला विळखा आणि स्थानिकांचे आपापसातील मतभेद, हेवेदावे, अतिक्रमण यावर शिर्डी नगरपरिषद, महसूल प्रशासन, साई संस्थान प्रशासन व पोलीस प्रशासन आणि शिर्डीतील स्थानिकांची ही सर्व जबाबदारी असून त्यांनी वेळीच कडक पाऊले उचलली नाही तर शिर्डीच्या आजच्या आर्थिक संकटातून बाहेर निघणे अवघड असणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button