Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
क्राईम

मालेगावाचा सहाय्यक आयुक्त सचिन महाले 33 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडला

नाले बांधकामाचे बिल मंजूर करुन देण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजारांची लाच घेणारा मालेगाव महानगरपालिकेचा सहायक आयुक्त सचिन महाले याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून गजाआड केले आहे. दरम्यान या सहायक आयुक्ताच्या घराची झडती घेतली असता एसीबी पथकाच्या हाती मोठे घबाड लागले असून यात साडेनऊ लाख रुपयांचे सोने व १३ लाख रुपयांच्या रोकडचा समावेश आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन सुरेंद्र महाले (वय ५१, रा. वर्धमाननगर, एलआयसी ऑफिस, मालेगाव कँम्प) असे लाचखोर संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे. तो मालेगाव महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक असून सध्या त्याच्याकडे कर विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यातच त्याने महापालिका आयुक्तांचा स्वीय सहायक (पीए) असल्याने तुमचे बिल तत्काळ मंजूर करुन देतो असे सांगत बांधकाम ठेकेदाराकडून एकूण बिलाच्या चार टक्के रक्कम व बक्षिस मागितल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणातील ३४ वर्षीय तक्रारदार हा बांधकाम ठेकेदार असून त्याने मालेगाव महानगरपालिके अंतर्गत गटार बांधकामाचे टेंडर भावाच्या नावे घेतले होते. काम पूर्ण करून नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्याकरीता त्याने संशयित महाले याची भेट घेतली असता महाले याने महापालिका आयुक्त यांचा स्वीय सहायक असल्याचा प्रभाव तक्रारदारावर टाकून बिल लवकर मंजूर करून देतो , मात्र बिल मंजूर झाल्यावर स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून बिलातील चार टक्के रक्कम द्यावी लागेल असे सांगितले होते.

बिल मंजूर झाल्यावर तक्रारदार हा महाले याला भेटावयास गेला असता, त्याने (दि.१३) रोजी पंचासमक्ष यांच्यावर ३३ हजार रुपयांची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. यानंतर (दि.२१) सायंकाळी महाले याने लाचेची रक्कम स्विकारताच सापळा रचून असलेल्या एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

याबाबत किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने महाले यास पोलीस कोठडी सुनावली आहे. एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अपर अधिक्षक माधव रेड्डी, पाेलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, ज्योती शार्दुल, परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button