Letest News
शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
राजकीयशिर्डी

समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

शिर्डी | प्रतिनिधी :
शिर्डी येथे आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वर्गीय समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वाड्यात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. साईबाबांच्या हयातीत त्यांच्याशी असलेल्या अतूट श्रद्धा आणि भक्तीच्या नात्यामुळे लक्ष्मीबाई शिंदे यांचे साईभक्त परंपरेत विशेष स्थान आहे.
लक्ष्मीबाई शिंदे यांच्या पवित्र वास्तूला भेट देत अधिकाऱ्यांनी साईबाबांच्या काळातील भक्तीपरंपरेचा अनुभव घेतला. या वेळी दत्तू भाऊ शिंदे पाटील यांच्या हस्ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लक्ष्मीबाई शिंदे यांच्या साईभक्तीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या वाड्यातील या भेटीमुळे शिर्डीच्या समृद्ध आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन अधिकाऱ्यांना घडले.
या प्रसंगी साईभक्ती, श्रद्धा आणि शिर्डीच्या ऐतिहासिक भक्तिपरंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. उपस्थितांनीही या भावपूर्ण प्रसंगाचा अनुभव घेतला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button