शिर्डी प्रतिनिधी
दारू पिण्यासाठी पैशे देत नसल्याने कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना शिर्डीत घडली आहे सौरभ उबाळे यकने शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे त्या फिर्यादीत म्हंटल आहे कि
मी वरिल ठिकाणी आई मंगल रमेश उबाळे, भाऊ साहिल रमेश उबाळे असे एकत्र राहावयास आहे. तसेच मी श्री साईबाबा सिनीयर कॉलेज येथे T.Y.B.A. ला शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे.
दि. 27/06/2025 रोजी रात्री 11/45 वाजणेचे सुमारास मी माझे मामा उमेश भाऊसाहेब शेजवळ रा. कालीकानगर शिर्डी ता. राहाता यांचे घरुन जेवण करुन चाललो होतो. तेव्हा शिर्डी बाजारतळ येथे १) सागर मोतीराम शिंदे रा. कालीकानगर शिर्डी ता. राहाता २) कृष्णा पवार रा. कालीकानगर शिर्डी ता. राहाता
(पुर्ण नाव माहित नाही) ३) गुड्डु जनार्धन शेजवळ रा. बाजारतळ शिर्डी ता. राहाता व इतर चारजण मला म्हणाले की, थांब तेव्हा मी थांबलो असता सागर शिंदे मला म्हणाला की, आम्ही पाप्या शेख चे नंबरकारी आहोत तु आम्हाला खंडणी दे आम्हाला दारु पिण्यासाठी पैसे हवे आहेत तेव्हा मी त्यांना म्हणालो की,
माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा सर्वांनी मिळून मला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली व सागर शिंदे याने मला कोयत्याचा धाक दाखवुन बळजबरीने सागर शिंदे व कृष्णा पवार, गुड्डु शेजवळ यांनी त्यांचे मोटारसायकलवर बसवुन बाजारतळ मटन मार्केट येथे घेवुन गेले व मला पुन्हा शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.
तेव्हा मी माझा मावसभाऊ सचिन सिताराम गायकवाड रा. भिमनगर शिर्डी यास फोन केला
तेव्हा ते मला तेथे सोडुन पळून गेले.
तरी दि. 27/06/2025 रोजी रात्री 11/45 वाजणेचे सुमारास मी माझे मामाकडे कालीकानगर शिर्डी येथे जेवण करुन भिमनगर शिर्डी येथे येत असतांना शिर्डी बाजारतळ येथे १) सागर मोतीराम शिंदे रा. कालीकानगर शिर्डी ता. राहाता २) कृष्णा पवार रा. कालीकानगर शिर्डी ता. राहाता (पुर्ण नाव माहित नाही) ३) गुड्डु जनार्धन शेजवळ रा. बाजारतळ शिर्डी ता. राहाता व इतर चारजण अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही).
मला म्हणाले की, थांब तेव्हा मी थांबलो असता सागर शिंदे मला म्हणाला की, आम्ही पाप्या शेख चे नंबरकारी आहोत तु आम्हाला खंडणी दे आम्हाला दारु पिण्यासाठी पैसे हवे आहेत तेव्हा मी त्यांना म्हणालो की, माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा सर्वांनी मिळुन मला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली
व सागर शिंदे याने मला कोयत्याचा धाक दाखवुन बळजबरीने सागर शिंदे व कृष्णा पवार, गुड्डु शेजवळ यांनी त्यांचे मोटारसायकलवर बसवुन बाजारतळ मटन मार्केट येथे घेवुन गेले व शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली म्हणून माझी यांचेविरुद्ध फिर्याद आहे असे सौरभ याने फिर्यादीत म्हटले आहे
वरील आरोपीविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनाला गुन्हा रजिस्टर नंबर0695/2025 शस्त्र अधिनियम 25,4 भारतीय न्याय संहिता 115(2),118(1),140(3), 189(2), 190,191(2),308(2),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनं चे पोलीस करीत आहेत