Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

“शिर्डीत भक्तांच्या जीवाशी खेळ!” – प्रसाद भोजनालय रोडवर मृत्यूचा उघडा खड्डा

कोट्यवधींचा रस्ता… पण मधोमधच ‘डेथ ट्रॅप’! शिर्डीतील साकुरी परिसरात साईबाबा संस्थानच्या प्रसाद भोजनालय रोडचे नुकतेच मोठ्या थाटामाटात रुंदीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. शहराच्या सौंदर्यात भर पडावी, भाविकांना सोयीस्कर प्रवास मिळावा या हेतूने झालेले हे काम आज स्वतःच अपघातांना आमंत्रण देत आहे. कारण भोजनालय गेटपासून काही अंतरावर भर रस्त्याच्या मध्यभागी ड्रेनेजचा मोठा खड्डा खचून धोकादायक अवस्थेत उभा आहे.
⚠️ भाविकांच्या जीवाशी खेळ – रोजच अपघातांचा थरार दररोज हजारो साईभक्त या रस्त्याने ये-जा करतात. मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असताना हा खड्डा वाहनधारकांना दिसतही नाही. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनं या खड्ड्यात आदळून नुकसानग्रस्त होत आहेत. किरकोळ अपघात तर रोजची बाब झाली असून, एखादा मोठा जीवघेणा अपघात घडण्याची भीती आता तीव्र झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


😡 “काम झालं की जबाबदारी संपली?” – नगरपरिषदेवर संतापाचा भडका रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच अशी अवस्था होणे म्हणजे कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये संताप उसळला असून, “कोट्यवधी खर्च करूनही टिकाव नसलेले काम का?” असा सवाल विचारला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही शिर्डी नगरपरिषद मात्र ढिम्म असल्याचा आरोप होत आहे.
📢 सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा – ‘आंदोलनाशिवाय पर्याय नाही!’ सामाजिक कार्यकर्ते समीर वीर यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून, “अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर ‘भीक मांगो आंदोलन’ करून नगरपरिषदेच्या दारात आंदोलन उभं करू,” असा थेट इशारा दिला आहे.


🔥 मुख्याधिकाऱ्यांना थेट सवाल – अपघात झाल्यावरच जाग येणार का? मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी तातडीने लक्ष घालून हा खड्डा दुरुस्त करावा, अन्यथा एखाद्या मोठ्या अपघाताची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
👉 शिर्डीसारख्या जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्रात अशी बेफिकिरी… प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button