Letest News
गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद”
क्राईमशिर्डी

शिर्डीतील ट्रेडिंग कंपनीने नागरिकांना मोठी आमिषे दाखवून कोट्यावधी रुपयांचा केला आहे घोटाळा! 

शिर्डी (प्रतिनिधी) मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील सायबर गुन्हांचा आलेख वाढत असतानाच गेल्या सहा वर्षांत नागरिकांनी सायबर फसवणुकीत गमावलेल्या रमकेतील सुमारे ६५० कोटी रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टल आणि सायबर हेल्पलाइन १९३० आणि १९४५ या माध्यमातून ही कारवाई केली आहे. तसेच सायबर पोलिसांनी या हेल्पलाइनच्या माध्यमातून ५० जणांचे जीव वाचवल्याचे सायबर विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पोलीस दलाच्या साठी अभिमानाची गोष्ट असून नागरिकही पोलीस दलाचे अभिनंदन करत मात्र राज्यात विविध शेअर्स ट्रेडिंग कंपन्या, विविध आर्थिक मल्टीलाइज ट्रेडिंग कं. निर्माण करून ग्राहकांना, नागरिकांना मोठी आमिषे दाखवून मोठी फसवणूक होत आहे. त्याकडेही आता सायबर क्राईम ब्रँचने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शेवगाव कोल्हापूर सातारा अधिक प्रमाणे शिर्डीतही शेअर्स ट्रेडिंग च्या नावाने नागरिकांचे कोट्यावधी रुपये गुंतवणूक साठी घेऊन मोठा घोटाळा केल्याची शिर्डीतील नागरिकांमध्ये, नागरिकात चर्चा आहे.

याकडे सायबर क्राईम ब्रँच ,पोलीस दलाने विशेष लक्ष घालून हा नेमकी प्रकार काय आहे हे उघडकीस आणावे अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र सह देशभरातील सायबर ठगांकडून वेगवेगळी प्रलोभने दाखवून, भूलथापा घालून तसेच भीती घालून सामान्य नागरिकांसह उच्च प्रतिष्ठित व्यक्तींना गंडा घातला जात आहे. या गुन्ह्यांची उकल करून यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचा एक भाग म्हणून नवी मुंबईत एक अत्याधुनिक सायबर मुख्यालय स्थापन करण्यात आले आहे.

येथे १०० हून अधिक
अनुभवी सायबर विश्लेषक कार्यरत आहेत. या केंद्रात डायल १९३० आणि डायल १९४५ या दोन हेल्पलाइनच्या माध्यमातून सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांची पोलीस मदत करत आहेत.सायबर हेल्पलाइनला गेल्या वर्षी १५ ऑक्टोबरपासून ९ लाख कॉल्स आले आहेत. तर, २०१९ पासून महाराष्ट्र सायबरने सुमारे साडेचार लाख फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गमावलेल्या रकमेतील ६५० कोटी रुपये वाचवले आहेत.

पोलिसांनी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलच्या माध्यमातून १६६ कोटींहून अधिक आणि सायबर हेल्पलाइन १९३० आणि १९४५ या माध्यमातून ४६४ हून अधिकची रक्कम वाचवली आहे. ही खरोखरच पोलीस दलाचे अभिमानाची गोष्ट असून सर्व पोलीस दलाचे क्राईम ब्रांचचे नागरिकांमधून अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र अनेक जण आता वेगवेगळ्या ट्रेडिंग कंपन्या काढून मोठे व्याजदर देण्याच्या दृष्टीने जाहिरात करून मोठी रक्कम जमा करत नागरिकांना ,गुंतवणूकदारांना फसवण्याचे काम करत आहे.

शेवगाव कोल्हापूर अशा ठिकाणी कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. शिर्डीतही असा प्रकार घडल्याचे नागरिकात चर्चा आहे .तरी सायबर क्राईम ब्रांचने याकडे लक्ष देऊन हा प्रकार नेमकी काय आहे, हा उघडकीस आणावा अशी मागणी शिर्डीतील नागरिकांमधून होत आहे. शिर्डीत अनेकांकडून मोठा परतावा देण्यात येईल असे आमिषे दाखवून सुरुवातीला विश्वास निर्माण करून मोठी कोट्यावधीची रक्कम एका ग्रो मोर ट्रेडिंग कंपनीने गोळा केली आहे

मात्र नंतर देण्यास टाळाटाळ होत आहे अशी गुंतवणूकदारांमध्ये आपापसात चर्चा आहे. तरी या संदर्भात सायबर क्राईम ब्रँच व पोलीस दलाने विशेष लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी शिर्डीतील नागरिक गुंतवणूकदारांमधून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button