Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

शिर्डी मतदारसंघात मतदारांची धक्कादायक घट ४० हजारांहून अधिक अर्ज जमा नाहीत!

शिर्डी : प्रतिनिधी
शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात धक्कादायक चित्र समोर आले आहे. ‘एसआयआर’ प्रक्रियेत तब्बल ४० हजार ३६ मतदारांचे अर्ज जमा न झाल्याने मतदारसंख्येत तब्बल १३.६३ टक्क्यांची घट झाल्याची माहिती प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांनी दिली आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकूण २७० मतदान केंद्रे असून यापूर्वी मतदारसंख्या २ लाख ९३ हजार ६३४ इतकी होती. मात्र, पुनरीक्षण मोहिमेत मोठ्या संख्येने अर्ज जमा न झाल्याने मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
शिर्डीत ८ ते ९ हजार मतदारांची घट!
विशेष म्हणजे, शिर्डी शहरातच तब्बल ८ ते ९ हजार मतदार कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिर्डीतील मतदारांच्या संख्येत एवढी मोठी घट नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


लोणीत साडेचार हजार, राहात्यात २२०० मतदार कमी
लोणी परिसरात सुमारे साडेचार हजार, तर राहाता शहरात तब्बल २ हजार २०० मतदारांची घट झाली आहे. शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर गेलेले विद्यार्थी तसेच लोहगाव परिसरातील मजुरांचे स्थलांतर यामुळे अनेक मतदार सध्याच्या पत्त्यावर उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मात्र, ४० हजारांहून अधिक मतदारांचे अर्ज जमा न होण्यामागे नेमकी कारणे काय? या प्रश्नाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदार यादीतील ही मोठी घट आगामी काळात राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
नव्या तरुण मतदारांची नोंदणी सुरू
दरम्यान, १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण मतदारांच्या नोंदणीची प्रक्रिया तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. डिजिटल लायझेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील टप्प्यात मतदारांकडून हरकती मागवून सुनावणी घेतली जाणार आहे.


यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदारसंख्या निश्चित होणार आहे.
४० हजार मतदारांचे अर्ज कुठे गेले? १३.६३ टक्के घट नेमकी किती कायम राहणार? आणि अंतिम मतदारयादीत किती नावे पुन्हा समाविष्ट होणार? याकडे आता शिर्डी मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button