Letest News
“दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत
राजकीयशिर्डी

श्री साईबाबांच्या चांदीच्या पादुकांचे भक्तिभावात शिर्डीत आगमन दिल्ली–नोयडा साईभक्तांची श्रद्धापूर्वक भेट- लखनौ येथे कमलाकर कोते यांच्याकडे पादुकांचे समर्पण

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव यांचा संगम दर्शविणारा एक पवित्र व भावनिक प्रसंग नुकताच शिर्डीत अनुभवास आला. दिल्ली–नोयडा येथील साईभक्तांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळ्यासाठी साईभक्त कमलाकर कोते यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना दिल्ली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही.

sai nirman
जाहिरात

त्यानंतर लखनौ येथे आयोजित करण्यात आलेल्या पादुका दर्शन सोहळ्यासाठी कमलाकर कोते गेले असता, दिल्ली येथील साईभक्त श्रीमती रीतू गांधी यांनी श्री साईबाबांच्या चांदीच्या अत्यंत सुबक, कलात्मक व सुंदर पादुका काचेच्या आवरणात ठेवून अत्यंत श्रद्धेने भेट दिल्या. या पादुकांवर साईबाबांच्या चरणांची प्रतिकृती असून त्या पाहताच साईभक्त भावविवश झाले. पादुकांचे दर्शन घेताना साईभक्तांनी “साई राम” नामस्मरण करत साईचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

या पवित्र पादुकांचे शिर्डीत आगमन झाल्यानंतर, साईबाबांच्या परंपरा व उत्सवांची पवित्रता जपत दरवर्षी रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अमानतवाडी (ता. वैजापूर) येथून पालखी घेऊन शिर्डीकडे पदयात्रा करणारे साईभक्त राजू ताटू यांच्याकडे श्री साईबाबा समाधी मंदिरात विधीपूर्वक व सप्रेम सुपूर्द करण्यात आल्या. साईबाबांच्या समाधीसमोर नतमस्तक होत पादुकांचे समर्पण करताना उपस्थित भक्तांच्या डोळ्यांत श्रद्धेचे अश्रू दिसून येत होते.

DN SPORTS

या सोहळ्यावेळी राहुल गोंदकर, शैलेंद्र कचरे, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, पंडित गुंडे यांच्यासह अनेक मान्यवर साईभक्त उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या पवित्र प्रसंगाचे साक्षीदार होत श्री साईबाबांच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

श्री साईबाबांच्या कृपेने घडलेला हा पादुका दर्शन व समर्पणाचा सोहळा साईभक्तांसाठी श्रद्धा, विश्वास आणि भक्तीची उंची अधोरेखित करणारा ठरला असून साईनामाच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button