Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरशिर्डी

shirdi news manoj kumar श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मनोजकुमार यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आलीय

सुप्रसिद्ध अभिनेता आणि शिर्डी साईबाबांचे परमभक्त मनोज कुमार यांचे आज वयाच्या 87 वर्षी निधन झालय. मनोज कुमार यांच्या जाण्याने शिर्डीसह साई भक्तांनावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. मात्र शिर्डीच्या आणि भाविकांच्या हृदयात के कायम स्वरुपी राहतील.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अभिनेता मनोज कुमार हे आपल्या प्रखर देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जात होते. त्याच बरोबरीने
शिर्डीच्या साईबाबांची महती त्यांनी देशभर “शिर्डी के साईबाबा” या चित्रपटाच्या माध्यमातून पोहचवली होती.


मनोज कुमार यांनी 1977 साली निर्मीत
“शिर्डी के साईबाबा” या चित्रपटामुळे शिर्डी साईबाबांची महती देशभर पसरली आणि या चित्रपटानंतर भाविकांची रिघ शिर्डीत येण्यास सुरुवात झाली.

मनोज कुमार हे शिर्डी साईबाबांचे परम भक्त होते. ते 1957 साला पासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत होते. साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर ते बहुतांशी वेळा साईची प्रतिमा असलेली भगवी फफनी आपल्या डोक्यावर बांधत असत

मनोज कुमार यांच्या “शिर्डी के साईबाबा”

या चित्रपटामुळे साईबाबांची महिमा करोड भाविकांपर्यंत पोहोचल्याने शिर्डी ग्रामस्थांनी त्यांचा 2001 साली शिर्डीत नागरी सत्कार ठेवत शहरातून भव्य मिरवणूकही काढली होती. तसेच शिर्डी नगरपंचायतच्या वतीने साईबाबांच्या मंदिराच्या गेट क्रमांक 1 जवळील जुन्या पिंपळवाडी मार्गाला मनोजकुमार गोस्वामी मार्ग असे नाव देण्यात आले आहे.

मनोजकुमार यांच्या जाण्याने शिर्डीतुनही मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत असून शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मनोजकुमार यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आलीय.

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक व सिने कलाकार आणि विशेष म्हणजे निसिम देशभक्त साईभक्त मनोज कुमार यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले असून सर्वत्र त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत आहे. स्वर्गीय मनोज कुमार हे साईभक्त होते ते काही वर्षांपूर्वी शिर्डीत साई दर्शनाला आले असता साईबाबा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये त्यांची विशेष अशी मुलाखत घेतानाचा क्षण

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button