Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
क्राईमशिर्डी

नगर मनमाड रस्त्यावर मंदिरा समोर कारची क्रेनला धडक प्रवीण गवांदे हा तरुण जागीच ठार

काल शिर्डी साकुरी शिवावर रात्री साडेदहा च्या सुमारास डी मार्ट मॉल समोर भीषण अपघात झाला असून रामनवमी उत्सव निमित्त लायटिंग चे काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या शिर्डी नगरपरिषदेच्या विद्युत विभागाचे क्रेन वाहनाला भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात 4 जण जखमी तर प्रवीण गवांदे हा युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने शिर्डी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थ व नागरिकांनी एकच गर्दी करत तातडीने मदत कार्य सुरू केले व जखमींना उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रामनवमी निमित्त विद्युत रोषणाईचे काम सुरू असल्याने शिर्डी नगरपरिषदेचे विद्युत विभागाचे क्रेन वाहन विद्युत रोषणाईच्या लाईट माळा लावत असताना क्रेनची पार्किंग लाईट सुरू होती आणि मागून येणाऱ्या वाहन चालकांना सतर्क करण्यासाठी एक खाजगी विद्युत काम करणारा तरुण रस्त्यावर उभा राहून दिशा दाखवत होता

kamlakar

मात्र भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी इको मारुती वाहन चालकाने उभ्या असलेल्या तरुणाला उडवत थेट क्रेन वाहनाला धडकून मोठा अपघात झाला आणि या अपघातात मात्र प्रवीण गवांदे हा तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली…या भिषण अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून ही धडक इतकी जबरदस्त होती की

इको वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः पूर्णपणे चक्काचूर झाला ईको वाहनचालक हा शिर्डीतील श्रीराम नगर भागात राहत असल्याची माहिती मिळत असून त्याच्या समवेत एक महिला सुद्धा होती या अपघातात इको वाहन चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून महिलेच्या डोक्याला मार लागला आहे

तर शिर्डी नगरपरिषद क्रेन वाहन चालक सुद्धा या भीषण धडकेत जखमी झाल्याचे समजते. मयत गवांदे हा शिर्डी येथील लायटिंग व्यवसाईक सुनील बाराहते यांच्याकडे कामाला होता दुर्देवी घटना घडल्याने शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button