Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

दिवसाढवळ्या मोटारसायकलची चोरी तर सावळी विहीर येथून आणखी एका दुचाकीची चोरी..!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथून एक व सावळीविहीर येथून एका अशा दोन मोटरसायकल नुकत्याच चोरी गेल्या असून शिर्डी पोलीस ठाण्यास त्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , कोपरगाव तालुक्यातील वेस येथील अनिल बाळकृष्ण जडे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की ,आपण 27 नोव्हेंबर 2023 ला रात्री आठ वाजेच्या दरम्यान सावळीविहीर येथील दोडीया हॉस्पिटल येथे दवाखान्यात आलो असता दवाखान्याच्या बाहेर मेडिकल समोर आपण आमची आठ हजार रुपये किमतीचे काळ्या रंगाची हिरो होंडा नंबर एम एस 17 ए आर 73 01 ही लॉक करून दवाखान्यात गेलो. पंधरा मिनिटांनी दवाखान्यात तपासणी करून परत बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी माझी मोटरसायकल दिसून आली नाही .तीचा इतरत्र शोध घेतला .मात्र ती न मिळून आल्यामुळे आपली खात्री झाली की, ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे .अशा आशयाची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर १०५८/२३ नुसार भादवी कलम३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


त्याचप्रमाणे डोहाळे तालुका राहता येथील संतोष शंकर हिंगे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की ,आपण आपल्या पंधरा हजार रुपये किमंतीच्या काळ्यारंगाच्या लालपट्टे असलेल्या हिरो कंपनीच्या डीलक्स मोटरसायकल वर एक डिसेंबर 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे संस्थांनच्या ड्युटीवर आलो असता शिर्डी नगरपालिके समोर पार्किंग मध्ये माझी मोटरसायकल हँडललॉक करून आपण नेहमीप्रमाणे ड्युटीला गेलो .सायंकाळी साडेपाच वाजता संस्थान कर्मचाऱ्यांचे साईप्रसादलायातून नेहमीप्रमाणे डबे आणण्यासाठी मी मोटरसायकल घेण्यासाठी आलो असता शिर्डी नगरपरिषदेच्या पार्किंग समोर माझी मोटरसायकल दिसून आली नाही. तिचा इतरत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्यामुळे आपली खात्री झाली की ती कोणीतरी चोरून नेली आहे.अशा अशायाची फिर्याद त्यांनी दिल्यानंतर या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 1069 /23 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मोटरसायकल चोरी गेल्याबद्दल शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button