Letest News
दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
क्राईमशिर्डी

मित्रावर ठेवलेला विश्वास ठरला घातक! गावाला जातो म्हणत घेतली मोटारसायकल… पण परत आला नाही! शिर्डी पोलिसात फिर्याद दाखल- तपास सुरू!

शिर्डी (प्रतिनिधी) –
“मित्रावर ठेवलेला विश्वासच शेवटी घातक ठरला,” अशी घटना शिर्डी परिसरात घडली आहे. साकुरी शिव येथील विश्वास बाबुराव वाघमारे (वय 46, व्यवसाय – मजुरी) यांनी आपल्या परिचितावर ठेवलेल्या विश्वासामुळे आता पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.

sai nirman
जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, वाघमारे यांची पाच वर्षांपासून प्रमोद रमेश गायकवाड (वय 40, रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याच्याशी घट्ट मैत्री होती. दि. 01 जुलै 2025 रोजी दुपारी सुमारास, वाघमारे सलून दुकानात काम करत असताना प्रमोद तेथे आला. “मला गावाला जायचे आहे, तुझी मोटारसायकल दे, आलो की लगेच परत करतो,” असे सांगून त्याने विश्वास संपादन केला आणि गाडी घेऊन गेला.

वाघमारे यांनी मित्रावर विश्वास ठेवून गाडीची चावी दिली, पण त्यानंतर प्रमोद हा परतलाच नाही. शोधाशोध करूनही तो व गाडी दोघेही बेपत्ता राहिल्याने अखेर वाघमारे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे.

DN SPORTS

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे गाडी ही हिरो कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल (क्रमांक MH-17 DB 3695) असून, तिची किंमत सुमारे ₹30,000/- इतकी आहे. इंजिन आणि चेसिस क्रमांकही पोलिसांकडे सादर केले आहेत.

सदर प्रकरणी शिर्डी पोलिसांनी तपास सुरू केला असून, ही घटना विश्वासघातातून झालेली फसवणूक की योजनाबद्ध चोरी याबाबत चौकशी सुरू आहे.

या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आले असून नागरिकांमध्ये चर्चा —
👉 “आजकाल मित्रावरसुद्धा पूर्ण विश्वास ठेवणे धोक्याचे झाले आहे!”

— साईदर्शन न्यूज, शिर्डी 📰

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button