Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
शिर्डी

साई दर्शनासाठी मलेशियातून आलेल्या साईभक्तांना शिर्डीचे उद्योजक दीपक निकम यांनी रूम भाडे केले माफ

शिर्डी मागील आठवड्यात चेन्नई विमानतळावरून शिर्डीला येणारे विमान सलग दोन दिवस रद्द झाले. त्यामुळे साई दर्शनासाठी मलेशियातून आलेल्या चव्वेचाळीस भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र येथील एका आलीशान हॉटेलचे कार्यकारी संचालक दीपक निकम यांनी
या भाविकांनी या काळात आरक्षित केलेल्या खोल्यांचे भाडे माफ करून या
चमूला सुखद धक्का दिला.
याबाबत सकाळशी बोलताना ते म्हणाले, योग प्रशिक्षक व त्यांचे सहकारी मिळून ४४ भाविकांसाठी आमच्या गोरडीया हॉटेलचे रूम व सूट आरक्षित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी सलग दोन दिवस विमान रद्द झाल्याने त्यांना नाईलाजाने तेथे मुक्काम करावा लागला. तिस-या दिवशी पुणे व मुंबई विमानतळावर उतरून त्यांना वाहनभाड्याचा अतिरिक्त खर्च करून शिर्डीत यावे लागले.
दुप्पट तिप्पट खर्च आणि मुक्कामही वाढला. शिर्डीत साईदर्शन झाल्यावर
या भाविकांनी आरक्षित काळातील खोल्यांचे भाडे अदा करण्याची तयारी दर्शवीली. मात्र त्यांना झालेला मनस्ताप आणि वाढलेला खर्च लक्षात घेऊन निकम यांनी या आरक्षित काळातल्या भाड्याची आगाऊ भरलेली मोठी रक्कम त्यांना परत केली. त्यांच्या या कृतीमुळे या चमूला सुखद धक्का बसला.
येथून रवाना होण्यापूर्वी या चमुतील प्रत्येकाचा सत्कार करण्यात आला. साईदर्शनासाठी भारतात आल्यानंतर झालेला मनस्ताप दुर व्हायला निकम यांच्या या कृतीमुळे मदत झाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button