Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरराजकीय

गुजरात मध्ये मुलाच्या पार्थिवाबरोबर वडिलांनी बाईक कपडे, बूट चश्मा देखील केली दफन

गुजरातच्या नडियादजवळील उत्तर्संडा गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. या गावातील 18 वर्षीय क्रिश परमार या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. क्रिशच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या एका निर्णयामुळं गावकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. कुटुंबीयांच्या या निर्णयामुळं गावकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

क्रिश परमार हा संजयभाई सुलेमानभाई परमार यांचा एकुलता एक मुलगा होता. अलीकडेच त्याने 12वीची परीक्षा दिली होती. त्यानंतर पुढील शिक्षणाची तयारी करत होता.

क्रिश परमार याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तेव्हा तो दुचाकीवरुन प्रवास करत असताना त्याचा अपघात झाला. क्रिशचे त्याच्या दुचाकीवर खूप प्रेम होते. त्यामुळं त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्याची दुचाकीदेखील दफन करण्यात आली. त्यांच्या या निर्णयामुळं गावकऱ्यांनाही अश्रु अनावर झाले. मिळालेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी क्रिश आणंद येथील कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी जात होता.

तेव्हा साधारण रात्री 8च्या सुमारास त्याची बाईक एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की क्रिशच्या डोक्यावर गंभीर मार लागला आणि अनेक जखमादेखील होत्या. क्रिशला लगेचच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले. 12 दिवस सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

शनिवारी क्रिशचा मृत्यू झाला. क्रिशच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. मात्र या दुखःच्या प्रसंगीदेखील त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेचा मान राखला. अंतिम संस्कारादरम्यान कुटुंबीयांनी त्याचे कपडे, बूट आणि चश्मादेखील दफन केला. इतकंच नव्हे तर त्याची प्रिय बाईकदेखील दफन करण्यात आली.

क्रिशचे वडील संजयभाई परमार यांनी सांगितले की, त्याला बाईक चालवण्याचे वेड होते. आमच्याकडे कारदेखील होती. मात्र त्याला बाईकवर फिरायलाच आवडायचे. त्यामुळं आम्हाला वाटायचे की त्याच्या मृत्यूनंतरही त्याची आवडती गोष्ट कायम त्याच्यासोबत राहावी. त्यामुळं आम्ही बाईकदेखील त्याच्यासोबत दफन केली. गावकरी आणि नातेवाईकदेखील हे पाहून भावूक झाले होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button