Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
शिर्डी

वादळी पावसाचा तडाखा,एक गायीसह तीन मेंढ्या ठार

कोपरगाव तालुक्यात अवकाळीने थैमान घातले असून काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने बक्तरपूर परीसरात वीज पडून एक गायीसह तीन मेंढ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.एका बाजूला उष्णता आहे तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस कोसळत आहे.दरम्यान हा अवकाळीचा जोर राज्यात आणखी राज्यातील विविध भागात पुढील आठवडाभर म्हणजे १८ मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.कोपरगाव तालुक्याच्या संवत्सरसह पूर्व भागाला चांगले झोडपले असून विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्यामुळे संवत्सर,कोकमठाण या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी व्यापारी गाळे उडून मोठे नुकसान झाले आहे.

kamlakar

तर काही ठिकाणी मोठ मोठे वृक्ष विजेच्या तारांवर पडल्यामुळे वीज प्रवाह देखील खंडित झाला होता.तर काल दि.१४ मे रोजी दुपारी झालेल्या पावसाने बक्तरपूर शिवारात पडलेल्या विजेमुळे एक गाय व तीन मेंढ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या मेंढ्या अन्य भागातील असल्याची माहिती आहे.या शिवाय चासनळी येथील बाळासाहेब देवराम चांदगुडे यांच्या वस्तीचे पत्रे उडून गेले असून त्यांच्या प्रपंच रस्त्यावर आला आहे.

दरम्यान मागील एक महिन्यापासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना झालेल्या पावसामुळे तात्पुरता थंडावा मिळाला असला तरी काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असल्याचे व काही मेंढ्या आणि गायींचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान घटनास्थळी बक्तरपूर येथील सरपंच मुक्ताबाई नागरे,ग्रामसेवक श्री.तडवी,तलाठी डी.बी.विधाते,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद कराडे आदींनी भेट दिली असून घटनेचा पंचनामा केला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button