Letest News
दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
राजकीयशिर्डी

गरिबांच्या उपचारांवर शासनाची फी-वाढीची कुऱ्हाड!” निर्णय मागे घ्या-नाहीतर रस्त्यावर रणसंग्राम!” — कमलाकर कोते पाटील यांचा इशारा

🏥 “गरिबांच्या छातीवर शासनाची फी-वाढ!” — आरोग्य सेवांवर शुल्काचा घणाघात
शिर्डी (प्रतिनिधी) – जनतेला मोफत आरोग्याची हमी देणाऱ्या शासनानेच आता शासकीय रुग्णालयांवर शुल्काची कुऱ्हाड चालवली आहे. “हा निर्णय म्हणजे गोरगरिबांच्या छातीवर थेट प्रहार आहे,” असा संतप्त सूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी उमटवला. आरोग्यसेवा ही सरकारची जबाबदारी असताना तीच विक्रीस काढण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


📑 “केस पेपरपासून ऑपरेशनपर्यंत पैसे” — नागरिक सनदेतला धक्कादायक बदल
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुधारित नागरिक सनदेमुळे जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत आता प्रत्येक टप्प्यावर शुल्क आकारले जाणार आहे.

⚠️ “खासगी रुग्णालयं परवडत नाहीत, मग गरीबांनी मरावं का?” — कोते यांचा संतप्त सवाल
ग्रामीण भागातील हजारो कुटुंबे खासगी रुग्णालयांच्या अवाढव्य बिलांमुळे आधीच कर्जबाजारी आहेत. अशा वेळी शासकीय रुग्णालयांनाही शुल्काच्या विळख्यात अडकवणे म्हणजे “गरीबांनी आजारी पडूच नये” असा संदेश देण्यासारखे आहे, असे कोते यांनी ठणकावले
“आरोग्य हा हक्क आहे, दया नाही!” — शासनाने हा मूलभूत सिद्धांत विसरू नये, असा इशाराही त्यांनी दिला.


📨 थेट मंत्र्यांच्या दारात धडक; निवेदन सादर
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना लेखी निवेदन पाठवण्यात आले आहे. लवकरच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे कोते यांनी स्पष्ट केले.


🔥 “निर्णय रद्द करा, नाहीतर रस्त्यावर रणसंग्राम!” — शिवसेनेचा थेट इशारा
“गरिबांच्या आरोग्यावर आर्थिक टाच आणणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा जनतेच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल,” असा स्पष्ट आणि कठोर इशारा देण्यात आला आहे.
शासनाने जनतेच्या जिवाशी खेळ करू नये, अन्यथा राजकीय व सामाजिक परिणामांना सामोरे जावे लागेल, असा ठाम संदेश या भूमिकेतून देण्यात आला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button