Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून चोरी करण्याचा प्रयत्न!शिर्डी पो.स्टे.ला दोन जणां विरोधात गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे
हॉटेल मध्ये हाऊसकिपींग म्हणुन कामास असलेल्या दोघांनी तोंडाला रुमाल बांधुन हॉटेल मधील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवुन हॉटेलमधील गेस्टचे रुममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे .
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हॉटेल मॅनेजर अमोल अशोक उगले यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, मी सुमारे तिन वर्षापासुन हॉटेल जी स्केअर येथे हॉटेल मॅनेजर म्हणुन काम पाहतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आमचे हॉटेलमध्ये सुमारे एक वर्षापासुन हाऊसकीपींग साठी नोकर म्हणुन काम करत असणारा अरमान जब्बार शेख रा. गावठाण तुळापुर जिल्हा अहिल्यनगर व वैभव ज्ञानेश्वर फलके रा. पुणतांबा ता. राहाता असे कामास होते. त्यांनी दि. 13/01/2025 रोजी हॉटेल जी स्केअर मधील रुम नं.212 मधुन सायंकाळी 07/00 ते 08/00 चे सुमारास हॉटेलमध्ये आलेले गेस्टचे 35,000/- रुपये चोरी केली होते

ते हॉटेलचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते तेव्हा त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबुल करुन सदरचे पैसे गेस्टला परत केले होते. त्यामुळे आम्ही त्यांना एक वेळ माफ करुन त्यांची पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती.
दिनांक 02/02/2025 रोजी सायंकाळी 07.30 ते 08/00 वा. चे सुमारास पुन्हा इसम नामे अरमान जब्बार शेख रा. गावठाण तुळापुर जिल्हा अहिल्यनगर व वैभव ज्ञानेश्वर फलके रा. पुणतांबा ता. राहाता हे तोंडास रुमाल बांधुन हॉटेल परीसरात येवुन हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे फिरवुन हॉटेलमधील वस्तुंचा अफरातफर करण्याचा प्रयत्न केला.

तसेच गेस्टच्या रुममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार हा हॉटेल मधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. त्यावेळी आम्ही हॉटेल स्टाफ ने त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली व तेथून निघुन गेले तेव्हा आमची खात्री झाली की ते चोरी करण्याच्या उ‌द्देशाने तोंडाला रुमाल बांधुन हॉटेल परीसरात येवुन त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हॉटेल मधे हाऊसकिपींग म्हणुन कामास असलेल्या अरमान जब्बार शेख रा.

गावठाण तुळापुर जिल्हा अहिल्यानगर व वैभव ज्ञानेश्वर फलके रा. पुणतांबा ता. राहाता यांनी तोंडाला रुमाल बांधुन हॉटेल मधील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवुन हॉटेलमधील गेस्टचे रुममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. म्हणुन माझी 1) अरमान जब्बार शेख रा. गावठाण तुळापुर जिल्हा अहिल्यानगर 2) वैभव ज्ञानेश्वर फलके रा. पुणतांबा ता. राहाता यांचे विरुध्द फिर्याद आहे. या फिर्यादी वरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button