Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
क्राईमशिर्डी

शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार-आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला राहाता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ६ मार्च रोजी देण्यात आला.
या प्रकरणी शाहबाज रियाज अली सय्यद (वय २८, रा. श्रीरामनगर, शिर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २०२२ मध्ये शिर्डी पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. नं. ३५२/२०२२) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तपासात उघड झाल्यानुसार आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. या अत्याचारांमुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३७६(३) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.
या खटल्याची सुनावणी राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

यामध्ये पीडित मुलगी, पंच साक्षीदार, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल तसेच तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पुराव्यांची साखळी आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले. तर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी या गुन्ह्याचा तपास केला.


सरकारी पक्षातर्फे अॅड. बाबासाहेब पानगव्हाणे यांनी युक्तिवाद केला, तर मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. व्ही. पी. खिस्ते यांनी बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी सुभाष माळी तसेच महिला पोलीस कर्मचारी पी. बी. बनकर यांनी सहकार्य केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button