Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
क्राईमशिर्डी

शिर्डीतील दोघांना ३ गावठी काट्यासह पकडले उर्वरित दोघे फरार

शिर्डी येथील गणेश आप्पासाहेब शेजवळ, रा. भिमनगर, शिर्डी, ता. राहाता याचेकडे अग्नीशस्त्र असून त्याने दहशत निर्माण करण्याकरीता फायर केला असून, फायर केल्याचा व्हिडीओ त्याचे मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळाली पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई तुषार धाकराव, व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदिवे बाळासाहेब नागरगोजे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

रोहित येमुल, प्रमोद जाधव, रमीजराजा आत्तार, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सारीका दरेकर व अरूण मोरे अशांचे पथक तयार करून संशयीताची माहिती घेवुन पडताळणी करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.तपास पथकाने दिनांक ०८/०२/२०२५ रोजी संशयीत इसमाचा शोध घेत असता आरबीएल चौकाजवळ, शिर्डी ता. राहाता याठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे

नाव १) गणेश आप्पासाहेब शेजवळ, वय ३४, रा. भिमनगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. त्यास विश्वासात घेऊन अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने मोबाईलमध्ये अग्निशस्त्रचा व्हिडीओ दाखवला. व सदरचे अग्नीशस्त्र हे त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ याचेकडे ठेवले असल्याची माहिती सांगीतली. पथकाने पंचासमक्ष २) अजय रत्नाकर शेजवळ, रा. भिमनगर, शिर्डी, ता. राहाता याचे घरातुन १,५०,००० रू किं. त्यात ३ गावठी पिस्टल, ३ जिवंत

काडतुसे व ३ रिकाम्या काडतुसाच्या पुंगळया जप्त केल्या आहेत. ताब्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ व अजय रत्नाकर शेजवळ यांचे कब्जातुन १,२०,०००/- रू किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत.

ताब्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ याचेकडे मिळून आलेल्या गावठी पिस्टल व काडतुसाबाबत विचारपूस केली असता त्याने ३) भाऊसाहेब साहेबराव जगताप रा.शिर्डी, ता. राहाता, ४) राकेश पगारे पुर्ण नांव पत्ता माहित नाही ५) रोशन सोमनाथ कोते रा. शिर्डी, ता. राहाता यांचेकडून प्रत्येकी १ पिस्टल व दोन जिवंत काडतुसे खरेदी करून, त्यापैकी ३ काडतुसे हवेत फायर केले असल्याचे सांगीतले.

पिस्टल विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेतला असता त्यातील रोशन सोमनाथ कोते, वय २४, रा.शिर्डी, ता. राहाता हा मिळून आलेला असून उर्वरीत फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे. वर नमूद आरोपीविरूध्द शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. ११६/२०२४ आर्म अॅक्ट कायदा कलम ३/२५, ७, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कल्बमें, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, व वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button