Letest News
मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह...
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमदर्शन – दुर्बीणद्वारे बिन टाक्याची शस्त्रक्रिया

शिर्डी, दि. २८ (प्रतिनिधी) – शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दुर्बीणद्वारे बिन टाक्याची इंडॉस्कोपी स्पाइन सर्जरी यशस्वीरित्या संपन्न झाली. ही शस्त्रक्रिया न्यूरो सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर व भूलतज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांच्या टीमने केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


रुग्णाची परिस्थिती व उपचाराची गरज

दुर्गादास राठोड (रा. शिर्डी) जिममध्ये व्यायाम करत असताना भारी वजन उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या पाठीच्या मणक्याची गादी सरकली आणि तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदनेमुळे त्यांचा डावा पाय पूर्ण तोडून टाकावा असे वाटत होते. अशा असह्य वेदना सहन करताना त्यांनी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर यांची भेट घेतली.


दुर्बीणद्वारे बिन टाक्याची शस्त्रक्रिया

रुग्णाला ऑपरेशनची भीती वाटत असल्याने, डॉक्टरांनी कमीत कमी जखम होईल अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. यासाठी हॉस्पिटलमध्ये प्रथमच दुर्बीणद्वारे इंडॉस्कोपी स्पाइन सर्जरी करण्यात आली. यात भूलतज्ञ डॉ. संतोष सुरवसे व जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.शस्त्रक्रियेनंतर रुग्ण भुतेतून बाहेर येताच चालायला लागले आणि असह्य वेदनेतून सुटका झाली. रुग्णाने आनंद व्यक्त करत डॉक्टर व हॉस्पिटलच्या न्यूरो ओटी टीमचे मनःपूर्वक आभार मानले.


सर्जरी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत

ही यशस्वी शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल न्यूरो ओटी टीमचे श्री साईबाबा संस्थानचे:

मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा. प्र. से उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे आदींनी अभिनंदन केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button