Letest News
लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड
अ.नगरशिर्डी

समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आणि देशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना

राहाता राजूभाई पठाण
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात आयोजीत दोन दिवसीय जिल्हास्तरीय तबलीगी इज्तेमाची मोठ्या उत्साहात सांगता झाली जिल्हाभरातून जवळपास ८० हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला प्रमुख वक्ते मुस्लीम धर्मगुरू मौलाना अब्दुल बारी यांनी इस्लामिक जीवनशैली, मोहम्मद पैगंबर यांचे विचार, 6 सिफात या मूल्यांवर बयान केले. बयानच्या समाप्तीनंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आपल्या भारत देशासह जगात शांतता नांदावी व सर्वांना आरोग्य लाभावे यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

sai nirman
जाहिरात
             दोन दिवसीय या इज्तेमाचे राहाता सेंटर तबलीग जमात व मुस्लिम बांधवांच्या वतीने अत्यंत प्रभावी व बारकाईने नियोजन करण्यात आले होते  सत्तर एकर जागेत धार्मिक प्रवचन कार्यक्रमासाठीचा भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता या इज्तेमा मध्ये जिल्हाभरातील ८० हजार पेक्षा अधिक मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला. मुस्लिम बांधवांच्या या कार्यक्रमासाठी हिंदू बांधवांनी आपली जमीन आणि पाण्याची उपलब्धता करून दिली जिल्ह्यासह राहाता तालुक्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन झाले इज्तेमा साठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी स्वतःचा खर्च स्वतः उचलले दोन दिवसीय या कार्यक्रमात अत्यल्प दरात सशुल्क जेवण व नाश्त्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती इज्तेमास अनेक हिंदू बांधवांनी भेट दिली या कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन योगदान व सहकार्य लाभले शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे यांनी देखील कार्यक्रम स्थळी भेट देऊन मुस्लिम बांधवांशी संवाद साधला पिंपरी निर्मळ व अस्तगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ तसेच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने प्रांताधिकारी माणिक आहेर तहसीलदार अमोल मोरे लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व पोलीस कर्मचारी राहाता नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी वीज वितरण कंपनीचे अभियंता व कर्मचारी तसेच साईबाबा संस्थान रुग्णालय डॉ मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहाता ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व आरोग्य सेवक यांचे विशेष सहकार्य लाभले 

हजारो स्वंयसेवकांचे श्रमदान

     जिल्हाभरातील सुमारे 80 हजारांहून अधिक बांधवांची उपस्थिती होती 70 एकरावर मांडव उभारणी पार्किंग साठी स्वतंत्र 9 वाहनतळ जेवणाकरिता स्वतंत्र चार मंडप सशुल्क जेवणाची व्यवस्था पिण्याचे पाणी स्वच्छतागृह उभारणी तसेच कार्यक्रम संपल्यानंतर स्वच्छता मोहीम याकरिता तसेच वाहतूक नियंत्रणासाठी हजारो मुस्लिम स्वयंसेवक बांधवांनी स्वतः श्रमदानातून नियोजनबद्ध व्यवस्था केली त्यामुळे कुणाचीही गैरसोय झाली नाही

आयोजकां कडून सर्वांचे आभार

DN SPORTS

राहाता येथे जिल्हास्तरीय इस्तेमा संपन्न झाला या धार्मिक कार्यासाठी परिसरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिला हिंदू समाज शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. जमीन उपलब्ध करून देणारे शेतकरी बांधव स्वयंसेवी सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते पिंपरी निर्मळ व अस्तगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ त्याचप्रमाणे पोलीस विभाग नगरपरिषद प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने हा इज्तेमा यशस्वी रित्या संपन्न झाल्याचे समाधान व्यक्त करत राहाता येथील मुस्लिम समाजाच्या वतीने सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार व्यक्त करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button