Letest News
शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
अ.नगरशिर्डी

shirdi sansthan news साई संस्थांनला शिर्डी महोत्सवाच्या निमित्त 25 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान सुमारे 16. 61 कोटी रुपये प्राप्त झाली देणगी!

शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, सरत्‍या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ जानेवारी २०२५ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत सुमारे १६.६१ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री. गाडीलकर म्‍हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ जानेवारी २०२५ याकाळात दानपेटीतून ०६,१२,९१,८७५/- रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ०३,२२,२७,५०८/- रुपये, पी.आर.ओ. सशुल्‍क पासद्वारे ०१,९६,४४,२००/- रूपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी व मनी ऑडरव्‍दारे ०४,६५,७३,६९८/- रुपये अशी एकुण १५ कोटी ९७ लाख ३७ हजार २८१ रुपये देणगी रोख स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे.

तसेच सोने ८०९.२२० ग्रॅम (रुपये ५४,४९,६८६/-) व चांदी १४ किलो ३९८ ग्रॅम (रुपये ०९,९३,८९५/-) देणगी प्राप्‍त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्‍यमातुन एकुण १६ कोटी ६१ लाख ८० हजार ८६२ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.
तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात ०६ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

तर सुमारे १ लाख ३५ हजाराहुन अधिक साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ०९,४७,७५० लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे ०१ कोटी ८९ लाख ५५ हजार प्राप्‍त झालेले आहे. याबरोबरच ५,९८,६०० साईभक्‍तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.


श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्राप्‍त झालेल्‍या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजन, संस्‍थानच्‍या विविध शैक्षणिक संस्‍था, बाह्य रुग्‍णांना चॅरिटीकरीता, साईभक्‍तांच्‍या सुविधाकरीता उभारण्‍यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्‍यात येत असल्‍याचे ही श्री. गाडीलकर यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button