Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
राजकीयशिर्डी

भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती

शिर्डी : ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने सामाजिक कार्य, ग्राहक हक्क आणि उपभोक्ता संरक्षणाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी शिर्डी येथील भगवान दगडू थोरात यांची राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले. ही नियुक्ती ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करणे, ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देणे तसेच तालुका, वॉर्ड व गावपातळीवर समितीच्या शाखांची निर्मिती करण्यासाठी कार्य करणे, अशी जबाबदारी थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
समितीच्या माध्यमातून प्रशिक्षण व विविध शिबिरांचे आयोजन करून सरकारी, निमशासकीय, खासगी आणि सहकारी क्षेत्रातील ग्राहक संरक्षणाशी संबंधित कायदेशीर बाबींची माहिती पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासह ‘जागो ग्राहक जागो’ या संकल्पनेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे भगवान थोरात यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button