Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
क्राईमशिर्डी

दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) दुसरे लग्न केल्याचा पतीला जाब विचारताच पतीने काठी व लाथा बुक्क्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.अशी फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,सौ. अर्चना प्रसाद कदम रा. निमगांववाडी ता. राहाता यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आपल्या पतीने सुमारे सहा ते सात महिन्यापासुन दुसरे लग्न केले असुन त्यामुळे आमचे मध्ये भांडणे होत असुन त्या भांडणामुळे मी सुमारे दोन महिन्यापासुन मी माझी आई सुनित ज्ञानेदव वेताळ रा. शिक्रापुर ता. पुणे हीचे कडे राहण्यास आहे.


दिनांक 04/02/2025 रोजी मी माझे सासरी निमगांव येथे असतांना सायंकाळी 06/00 वा सुमारास माझे पती -प्रसाद गोरक्ष कदम यांनी दुस-या महिले सोबत मला लपवुन लग्न केल्याचे मला माझ्या सासु सास-यांकडुन समल्याने मी त्यांना त्या बाबत विचारले असता त्यांनी मला शिवीगाळ करुन लाथाबुक्कांनी व तसेच काठीने मारहाण केली.

तरी मी त्या दिवशी रात्रभर सासरीच थांबले व दुस-या दिवशी मी पोलीस स्टेशनला आले होते. त्यावेळी पोलीसांनी मला दवाखान्यात उपाचर कामी पाठवल्यावर मी ग्रामीण रुग्नालय राहाता येथे तपासणी केली होती. व त्या नंतर मी पुन्हा माझे पती व सासु सासरे यांचे मध्ये बदल होईल या आशेने पोलीस स्टेशला तक्रार न देता माझे सासरी गेले.

परंतु माझा नवरा व माझे मध्ये त्यांनी केलेल्या दुस-या लग्नाचे कारणा वरुन वारंवार भांडणे होत असल्याने मी दिनांक 20 मार्च 2025 रोजी माझे माहेरी वेताळ ता. शिक्रपुर जि. पुणे येथे गेले असुन तेव्हा पासुन मी माझे माहेरीच राहत आहे. माहेरी असतांना मला माझे दोन्ही मुले वारंवार फोन करुन आई तुझी आठवण येते असे म्हणत असल्याने मी परत दिनांक 31/05/2025 रोजी सायंकाळी 06/00 वा सुमारास सासरी निमगांव को-हाळे ता. राहाता येथे राहण्यास आले होते.

परंतु मी घरात प्रवेश करताच तेथे माझी सासु-सुनंदा गोरक्ष कदम, सासरे-गोरक्ष पंढरीनाथ कदम यांनी मी घरात गेल्या गेला मला म्हणाले की, ” तु घरात यायचे नाही. तु कशीकाय घरात आली हे आमचे घर आहे. तुझा नवरा येथे नाही. त्याने दुसरे लग्न केले आहे. तु तुझा नवरा आल्यावर काय ते बघ, येथे राहायचे नाही.

त्यावेळी मी मुलगी धनश्री कडे गेली तर मुलगी रडत होती व ती आई तु येथुन जावुन नको असे म्हणत होती. त्यावेळी माझे सासु सासरे माझे सोबत शाब्दीक वाद करुन शिवीगाळ करत होते त्यावेळी मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोघांनी मला चापटीने मारहाण करुन धक्का बुक्की केली.

अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाले असून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 613 /2025 नुसार भारतीय न्याय संहीता कलम 118 (एक) 115 (2,)352 /351 (2) ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button