Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
खेळशिर्डी

शिक्षणातील आर्थिक साक्षरता’ : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियोजनाची गरज! – प्रा. विजय शेटे

शिर्डी | प्रतिनिधी
“अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र शिक्षणाकडे खर्च म्हणून नव्हे, तर भविष्यासाठी केलेली सर्वात मौल्यवान गुंतवणूक म्हणून पाहण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन श्रीगणेश शिक्षण संस्था, कोऱ्हाळे (शिर्डी बायपास)चे अध्यक्ष तथा शैक्षणिक मार्गदर्शक प्रा. विजय शेटे यांनी केले आहे.
‘शिक्षणातील आर्थिक साक्षरता’ या लेखमालेच्या पहिल्या भागातून त्यांनी विद्यार्थी, पालक आणि समाजासमोर शिक्षणाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन मांडला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


प्रा. शेटे म्हणतात की, आज अनेक पालक आणि विद्यार्थी “शिक्षण महाग आहे” या विचारामुळे उच्च शिक्षणापासून दूर राहतात. प्रत्यक्षात शिक्षणावर केलेला खर्च हा केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून, विद्यार्थ्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया मजबूत करणारी गुंतवणूक असते. आज शिक्षणासाठी खर्च केलेला प्रत्येक रुपया उद्या आत्मविश्वास, स्वाभिमान, आर्थिक स्थैर्य आणि यशाच्या रूपाने अनेकपटींनी परत मिळतो.
आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी त्यांनी दोन तहानलेल्या कावळ्यांची गोष्ट सांगितली आहे. एका कावळ्याने दगड टाकून पाण्याची पातळी वाढवत मेहनतीने तहान भागवली, तर दुसऱ्याने परिस्थितीचा अभ्यास करून स्ट्रॉचा वापर करत कमी वेळात आपले ध्येय गाठले. या उदाहरणातून केवळ कष्ट नव्हे, तर योग्य माहिती, योग्य नियोजन आणि उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर यामुळेही यश मिळते, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला.


शिक्षणाच्या बाबतीतही हीच बाब लागू होते. आज शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, फी सवलती, शैक्षणिक कर्ज, तसेच सामाजिक संस्था, ट्रस्ट आणि खासगी कंपन्यांकडून आर्थिक सहाय्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांची योग्य माहिती घेऊन त्यांचा लाभ घेतल्यास आर्थिक अडचण ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या आड येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रश्न पैशांचा नसून योग्य माहिती, जिद्द आणि बदललेल्या दृष्टिकोनाचा आहे. ज्याच्याकडे शिकण्याची इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी आहे, त्याच्यासाठी शिक्षणाचे अनेक मार्ग खुले आहेत,” असा आशावादी संदेश प्रा. विजय शेटे यांनी या लेखातून दिला आहे.
लेखमालेच्या पुढील भागात शिक्षणासाठी उपलब्ध आर्थिक योजनांची सविस्तर माहिती आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button