Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

परिवर्तनाच्या प्रवासातील प्रत्येक सहकाऱ्याचे मनःपूर्वक आभार – सौ. जयश्री विष्णू थोरात यांचे भावनिक निवेदन

शिर्डी, दि.–
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारयात्रेला आज मतदानाची सांगता झाली असताना, महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. जयश्री विष्णू थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रति आणि नागरिकांप्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करणारे भावनिक निवेदन जारी केले.

sai nirman
जाहिरात

“या संपूर्ण प्रचार काळात माझ्यासोबत घरोघरी फिरत, खांद्याला खांदा लावून या परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी झालात, त्या प्रत्येक साथीदाराचे मनःपूर्वक आभार,” अशा शब्दांत सौ. थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रति विशेष प्रेम व्यक्त केले. मागील काही आठवड्यांपासून त्यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाची दिशा जाणून घेतली होती. या संपूर्ण प्रवासात त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जनतेचा सहभाग हेच त्यांच्या उत्साहाचे खरे बळ असल्याचे त्या म्हणाल्या.

आजच्या मतदानानंतर सौ. जयश्री थोरात यांनी नागरिकांना विश्वास दिला की, “निकाल काहीही असो, लोकसेवेचा माझा संकल्प आणि प्रामाणिकपणा तसाच कायम राहील.” जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे परिवर्तनाचा मार्ग अधिक दृढ झाल्याचेही त्या म्हणाल्या.

DN SPORTS

प्रचारादरम्यान महिलांनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि सर्व समाजघटकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, “शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छ-सुरक्षित आणि सुसंस्कृत शहरासाठी मी सदैव तत्पर राहीन.”

निवेदनाच्या शेवटी सौ. थोरात यांनी सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद देत आश्वासन दिले की, जनतेचा विश्वास हीच त्यांची खरी जमेची बाजू आहे आणि भविष्यातही त्या त्याच निष्ठेने सार्वजनिक जीवनात कार्यरत राहतील.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button