Letest News
शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा... गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी CITYMARKET सज्जगणेशमूर्तीपासून सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तू एकाच छत... १४ वर्षांचा भगंदराचा त्रास… ५-६ शस्त्रक्रियांनीही आराम नाही राहात्यात उपचारानंतर पुन्हा मिळाला वैद्य... कोट्यवधींची ‘साई ज्योत’ अर्धवटच! संचालक विठ्ठल पवार यांच्या पाठपुराव्याने प्रकरण ऐरणीवर
क्राईमशिर्डी

शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात!

शिर्डी : साईनगरीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांवर शिर्डी पोलिसांनी कारवाई केली आहे. नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवर फिरताना आढळलेल्या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक माहिती अथवा कागदपत्रे सादर करता आली नसल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री डायल ११२च्या पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीस पथकाला अंधारात दुचाकीवर दोन इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी तारकेश कुमार गणेश (वय २९, रा. बिहार) व सागर मच्छिंद्र त्रिभुवन (वय २४, रा. कालिकानगर, शिर्डी) अशी नावे सांगितली.
दुचाकीच्या मालकीवर प्रश्नचिन्ह?
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील बजाज पल्सर एनएस १६० (एमएच १५ केझेड ५६११) या दुचाकीची कागदपत्रे व मालकी हक्काबाबत विचारणा केली. मात्र, दोघांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्या

मुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघेही सूर्यास्त ते सूर्योदयाच्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत स्वतःचे अस्तित्व लपवून काहीतरी मालाविरुद्धचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. त्यानंतर पंचांना बोलावून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस कायद्याचा दणका!
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब दौलत पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०७८२/२०२६ दाखल करण्यात आला असून, दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ व १२४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
साईनगरीत रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button