Letest News
शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात! संकटात साई संस्थान ठरले आधारवड!कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाखांची मदत पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष अहिल्यानगरचा डाग पुसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड शिर्डीतील काही पोलिसांमुळे प्रयत्नांना तिलांजल... ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं...
राजकीयशिर्डी

हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६ पुरस्काराने अशोकलाल (काका) लोढा यांचा गौरव

अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे श्री. अशोकलाल (काका) लोढा यांना दै. पुण्यनगरीच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा मानाचा पुरस्कार बिजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. कृष्ण प्रकाश तसेच दै. पुण्यनगरीचे मुख्य संचालक श्री. भावेश शिंगोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री. अशोकलाल (काका) लोढा यांनी समाजहित जपत अनेक उपक्रम राबविले आहेत. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच “हिरोज ऑफ अहिल्यानगर” हा पुरस्कार त्यांना मिळणे म्हणजे त्यांच्या कार्याची योग्य दखल असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


या यशाबद्दल साई कुबेर डेव्हलपर्स, कोपरगाव, साईबाबा परिसरातील ग्रामस्थ, शिर्डी गावकरी तसेच समस्त रूई (कोहकी) ग्रामस्थांच्या वतीने श्री. अशोकलाल (काका) लोढा यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
“काकांचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श; त्यांचा सन्मान म्हणजे संपूर्ण परिसराचा सन्मान”, अशा शब्दांत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत काकांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांनी भविष्यातही समाजहिताची ही परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हार्दिक अभिनंदन काका…! आपल्या कार्याचा हा गौरव संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. 🌹🏆👏

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button