Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
क्राईमशिर्डी

काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने तीन जणाविरोधात शिर्डी पोस्टेला फिर्याद दाखल!

शिर्डी( प्रतिनिधी )दिल्लीच्या एका शेतकऱ्याची शेती आम्ही कसण्यास घेतल्याचा राग आल्याने येथील तीन जणांनी मला व माझ्या पतीला लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला शोभा चंद्रकांत चौधरी नांदुरखी बुद्रुक यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शोभा चंद्रकांत चौधरी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,आम्ही गौतमसिंग सैनी रा. दिल्ली यांचे नांदुर्खी शिवारात कृष्णमंदीराचे जवळ असलेली शेती ही आम्ही स्वत. करुन कटुंबाची उपजिवीका करते. आमचे घराचे शेजारीच पांडुरंग प्रल्हाद भराटे हे राहण्यास असुन ते कायमस्वरुपी काही न काही कारणावरुन वाद करत असतात.


दि. 08/04/2025 रोजी सकाळी 07/45 वाजण्याचे सुमारास मी गौतमसिंग सैनी यांचे शेतात घास कापत असतांना माझे घराशेजारी राहणारे पांडुरंग प्रल्हाद भराटे हा आला व म्हणाला की, तु या घासाच्या शेतात कशी काय आलीस तु येथुन निघुन जा, असे म्हणुन मला शिवीगाळ करु लागले, तेव्हा मी त्यांना म्हणाले की, मी तुमच्या शेतात काम करत नाही, गौतमसिंग सैनी यांनी त्यांची शेती आम्हाला कसण्यास दिलेली आहे. त्यात मी घासाचे पिक केलेले आहे, मी येथुन निघुन जाणार नाही.

असे म्हणाल्याचा त्यास राग आल्याने त्याने गणेश नवनाथ भराटे, सागर पांडुरंग भराटे, माणिक पांडुरंग भराटे यांना बोलावुन घेतले व त्यांनी मला लाथाबुक्यांनी मारहाण करुन लाकडी काठीने मारहाण केली त्यावेळी माझे पती चंद्रकांत भिमा चौधरी हे सोडवासोडव करण्यास आले असता त्यांनाही लाकडी काठीने मारहाण करुन मला व माझे पती चंद्रकांत यांना जखमी केली व म्हणाले की,

तुम्ही गौतमसिंग सैनी याची शेती करायची सोडुन द्या व तुम्ही येथुन कोठेही निघुन जा, नाहीतर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 364 त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button