Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
शिर्डी

शिर्डी येथील सिंधी समाज साई झुलेलाल ट्रस्ट मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय 

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी येथे सर्व प्रथम सिंधी समाजाचे दानशूर व्यक्तीमत्व असणारे स्वर्गवासी छतुमल केसवानी यांनी शिर्डीत साई झुलेलाल मंदिर असावे म्हणून आपली लाखो मोलाची असलेली जागा दानस्वरूपी झुलेलाल मंदिरासाठी दिली होति व तेथे भव्य मंदिर बनवण्यात आले होते अनेक वर्ष तेथे सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले काही वर्षा नंतर दानशूर स्वर्गवासी छतुमल केसवानी यांचे निधन झाले आणी त्या मंदिराच्या जागेला ग्रहण लागले जागेच्या हिश्यावाटयाला सुरुवात झाली छतुमल केसवानी यांना असलेल्या मूल मुली मध्ये नियमानुसार वडिलांच्या प्रॉपर्टीत मूल मुली सर्वांचा हक्क असतो म्हणून आपआपले प्रॉपर्टीच्या हक्कासाठी त्या कुटुंबाची लढाई सुरु झाली आणी त्यानंतर शिर्डी येथील प्रतिष्ठीत नागरिक व शिवसेनेचे जेष्ठनेते कमलाकर कोते आणी समाजसेवक राहुल गोंदकर यांनी ह्या कुटुंबाचे वाद मिटावे म्हणून पुढाकार घेऊन ज्या ठिकाणी मंदिर व त्यांचे घर आहे हे विकत घेतले त्यापलीकडे जाऊन ह्या दोघांनी तेथे असलेले मंदिर न पाडता आहे तसेच ठेवले आणि सिंधी समाजाचे स्वताच्या जागेत मंदिर व्हावे म्हणून त्यांनी सिंधी समाजाला जसे जसे मंदिर जागेसाठी व बांधकामाला पैशे कमी पडतील तशे तशे पैशे जागा खरेदीच्या पलीकडे जाऊन पैशे दिलेत त्यांचं पैशे देण्याचे काहीच कारण नव्हते परंतु हे दोघेही धार्मिक वृत्तीचे असल्याने मंदिर कोणाचेही असो ते आपलेच दैवत आहे हे समजून त्यांनी जागेच्या खरेदी व्यक्तरिक्त आजपर्यंत दहा ते पंधरा लाख रुपये मंदिर बांधकाम करण्यासाठी दानरूपी दिलेले आहेत
असेच देशभरातील अनेक सिंधी समाजातिल् लोकांनी हे मंदिर शिर्डीत बनवण्यासाठी लाखो रुपये देणगी दिली आहे त्यातील काही दानशूर लोकांनी बनावट पावत्या देण्यात आल्याचे कळते आणी काही दानशूर लोकांना तर पैशे घेऊन पावती सुद्धा देण्यात आलेली नाही असेही कळते आलेल्या पैश्यायातून मंदिराचे काम सुरु करण्यात आले त्यात् अनेक वस्तूंचे बिले घेण्यात आलेले नव्हते काही बिल घेतले तर ते कच्चे बिल घेतले होते मंदिराचे काम अर्ध्यावर होत असतांना तक्रारदाराला ह्या मंदिराच्या ट्रस्टींनी मंदिराचे ट्रस्टी म्हणून घेतले होते तक्रारदाराने ज्यावेळेस मंदिराचे हिशोब बघितले आणी बिले बघितली असता त्यात तक्रारदारास अनेक बिले बनावटी असल्याचे लक्षात् आल्यानंतर तक्रारदाराने तात्काळ ट्रस्टींची बैठक घेतली आणी हिशोब विचारले असता त्यात तक्रारदारास तफावत दिसली असता तक्रारदाराने त्या ट्रस्टी पदाचा तात्काळ राजिनामा दिला त्यानंतर ह्या ट्रस्टींच्या लक्षात आले की आपले पितळ उघडे पडणार असल्याने त्यांनी काही बिले अधिक पैशे देऊन बनावट तय्यार करून घेतली आणि मंदिरासाठी जी जागा खरेदी केली ती सुद्धा दोन नंबर धंदा करणार्याची आहे मंदिरात अनधिकृतपणे लग्न लावले जातात मंदीरात पूजा करण्यासाठी दारू पिणारा गुटखा खाणारा ब्राम्हण ठेऊन पूजा अर्चा केली जाते समाजातील अनेक लोकांकडून इच्छा नसतांना बळजबरीने देणगी पावती टाकून पैशे वसुल केले जातात अश्याच प्रकारे अर्जदाराची इच्छा नसतांना ह्या ट्रस्टींनी बळजबरीने पावती टाकली होती आणी वसुलीची सक्ती करुंन घेण्यासाठी आल्यावर अर्जदाराने शिर्डी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार केली होती ज्या ठिकाणी मंदिर बांधलेले आहे त्याचे नगर परिषद कडून बांधकाम परवानगी सुद्धा घेतलेली नाही अर्जदाराच आणी समाजाचं काहीच वैर नाही जरी अर्जदार ह्याच समाजातील आहे तरीही जेथे भ्रष्टाचार होते जेथे अनाधिकृतपणे काही होत असते त्याविरोधात अर्जदाराणे कायम आवाज उठविला आहे साधुसंत व देवाच्या नावाने पैशे खाणाऱ्या लोकांना हा माध्यम झालेला आहे एखादे ट्रस्ट स्थापन करावं व धार्मिक लोकांना लुबाडाव असे उद्योग सुरु असल्याचे लक्षात येते धर्मादाय आयुक्त सो आपण मला शंका असलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषी असणारे लोकांवर कारवाई करून ही ट्रस्ट बरखास्त करावी तसेच हे पत्र उचित कारवाईसाठी
न्यायविधी मंत्री सो. महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मुख्य सचिव धर्मादाय आयुक्त मंत्रालय मुंबई
जिल्हाधिकारी सो अहमदनगर
प्रांत सो शिर्डी भाग शिर्डी
तहसीलदार सो राहात
मुख्याधिकारी सो शिर्डी नगर परिषद शिर्डी यांना देखील पाठवण्यात आलेले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button