Letest News
लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद
अ.नगरराजकीय

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच शिर्डी व परिसरातही क्रिकेटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष!

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच शिर्डी व परिसरात क्रिकेटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. दुबई येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवताच देशात सर्वत्र मोठा आनंद साजरा करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या अंतिम सामन्यात रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. रोहित शर्माच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे भारताने न्यूझीलंडला २५१ धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्यानंतर रो’हिट’ शो सर्वांना पाहायला मिळाला. कारण रोहित शर्माने एकहाती तुफानी फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

श्रेयस अय्यरनेही यावेळी ४८धावा केल्या खऱ्या, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. पण तरीही भारताने हा सामना जिंकला. भारताचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद आहे. त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा बदला या विजयासह घेतला आहे. कारण २००० साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताने यावेळी चार विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत केले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.


न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला खरा, पण पहिल्याच षटकापासून रोहित शर्माने आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळी शुभमन गिल हा फक्त रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याचे काम करत होता. कारण रोहित शर्मा आपल्या पोतडीतून एकामागून एक फटके काढत होता.

रोहित शर्माने आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करायला लागला होता. रोहितला श्रेयस अय्यर चांगली साथ देत होता. पण यावेळी फिरकीपटूंनी या दोघांवर दडपण आणले आणि रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. रोहितने यावेळी सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची दमदार खेळी साकारली.रोहित बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली

आणि तो संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होता. पण या नादात त्याने मोक्याच्या क्षणी आपली विकेट बहाल केली. श्रेयसने यावेळी ४८ धावा केल्या. श्रेयस बाद झाल्यावर अक्षर पटेल सेट झाला होता. पण त्यानेही मोठा फटका मारत आपली विकेट सोडली, त्याने २९ धावांची भर टाकली. पण त्यानंतर लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवताच देशात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. शिर्डी व परिसरातही फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button