Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
राजकीयशिर्डी

२.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता

शिर्डी : साईनगरी शिर्डीत दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. गर्दीच्या वातावरणात अनेकदा मौल्यवान वस्तू हरवण्याच्या घटना घडतात. अशाच एका प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे साईबाबांच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मान आणखी उंचावला आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या श्रीमती सिंधुताई आंबेडकर यांना समाधी मंदिराच्या मुखदर्शन हॉलच्या बाहेर गस्तीदरम्यान एक सोन्याची बांगडी आढळून आली. ही बांगडी कोणत्या भाविकाची आहे याची कोणतीही माहिती नसताना त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.
संस्थानच्या नियमानुसार संबंधित दागिन्याची तपासणी करण्यात आली. सोनारामार्फत वजन व मूल्यांकन केले असता सदर बांगडीचे वजन १४ ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तिची अंदाजे किंमत २ लाख १० हजार रुपये असल्याचे समोर आले. एवढ्या मोठ्या किमतीचा दागिना हातात आल्यानंतरही श्रीमती आंबेडकर यांनी कोणताही मोह न दाखवता प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विशेष बाब म्हणजे, श्रीमती सिंधुताई आंबेडकर या कायमस्वरूपी कर्मचारी नसून कंत्राटी स्वरूपात सुरक्षा विभागात कार्यरत आहेत. त्यांचा मासिक पगार सुमारे २० हजार रुपये आहे. त्यांनी परत केलेल्या सोन्याच्या बांगडीची किंमत त्यांच्या जवळपास एका वर्षाच्या उत्पन्नाइतकी आहे. आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थितीत असतानाही त्यांनी प्रलोभनाला बळी न पडता आपले कर्तव्य आणि नैतिक मूल्ये जपली. त्यामुळे त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
श्री साईबाबा संस्थानमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या वस्तू, दागिने आणि रोख रक्कम भाविकांकडून हरवते किंवा सापडते. मात्र अशा प्रसंगी कर्मचारी वर्गाने दाखविलेली प्रामाणिकता हीच संस्थानची खरी ताकद असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. श्रीमती आंबेडकर यांच्या कृतीमुळे संस्थानबद्दल भाविकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.


या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्रीमती सिंधुताई आंबेडकर यांचा विशेष सत्कार केला. यावेळी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांना प्रशस्ती देण्यात आली. संस्थानच्या अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या कार्याचे अभिनंदन करून इतर कर्मचाऱ्यांसाठी त्या प्रेरणास्थान असल्याचे सांगितले.
साईबाबांनी आपल्या आयुष्यात श्रद्धा, सबुरी, सेवा आणि प्रामाणिकपणाचा संदेश दिला. आजही त्या शिकवणीचा प्रभाव संस्थानच्या कर्मचाऱ्यांमध्ये जिवंत असल्याचे श्रीमती सिंधुताई आंबेडकर यांच्या कृतीतून दिसून आले. लाखो रुपयांचा दागिना समोर असतानाही सचोटीची वाट निवडणारी ही महिला कर्मचारी समाजासाठी आदर्श ठरली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button