Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
राजकीय

उमेदवारांसाठी निवडणूक खर्च लेखे तपासणी वेळोपत्रक जाहीर

शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३मे, ७ मे व ११ मे २०२४ रोजीच्या दिनांकास सकाळी १० ते सायकांळी ५ या वेळेत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या खर्चाचा हिशोब सादर करावा. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे.

sai nirman
जाहिरात

शिर्डी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी त्यांची दैंनदिन खर्चाची नोंदवही संपूर्ण प्रचार कालावधीत किमान तीन वेळा खर्च निरीक्षकांसमोर सादर करणे आवश्यक आहे.

DN SPORTS

जे उमेदवार निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीकरिता सादर करणार नाहीत त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील १९५१ बाब क्र.७७ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. शिर्डी लोकसभेतील उमेदवारांच्या खर्च लेख्यांची तपासणी ३ मे, ७ मे व ११ मे २०२४ या तारखेला निवडणूक खर्च सनियंत्रण कक्ष, उपकोषागार कार्यालय, प्रशासकीय इमारत,

kamlakar

राहाता येथे केली जाणार आहे. या तारखांना सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या दैंनदिन खर्चाच्या नोंदवह्या, देयके, प्रमाणके यांच्यासह उपस्थित राहावे. असे आवाहन श्री.कोळेकर यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button