Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
अ.नगरक्राईम

भूमिअभिलेख विभागात भ्रष्टाचाराचा भंडाफोड-दिड लाखांची लाच घेणारा भुकरमापक अजय परदेशी रंगेहात अटक

अहिल्यानगर / नाशिक :
नेवासा तालुक्यातील भूमिअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचे जाळे उघडे पाडत भुकरमापक (वर्ग 3) अजयभानसिंग गुलावसिंग परदेशी (वय 48) यांना दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकने रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे भूमिअभिलेख कार्यालयात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट उसळली आहे.

sai nirman
जाहिरात

शिवार रस्त्याची लढाई… आणि वाढता भ्रष्टाचार

पाथरवाला-गोयगव्हाण शिवारातील शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठीचा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला होता. 2022 पासून ही लढाई न्यायालयापर्यंत पोहोचली.

DN SPORTS

उच्च न्यायालयाने मोजणी शेतकऱ्यांकडून फी न घेता शासनाने करावी, असा स्पष्ट आदेश दिला.
त्यामुळे 2023 मध्ये रस्ता खुला झाला.

परंतु मार्च 2025 मध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर होताच काहीजणांनी पुन्हा गैरमार्गाने खुणा बदलून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.


मोजणी ‘ठरवून’ करण्यासाठी दिड लाखांची मागणी

30 जून 2025 रोजी तक्रारदारांच्या भावाने भूमिअभिलेख कार्यालय नेवासा येथे दुरुस्ती अर्ज केला असता,
भुकरमापक अजय परदेशी यांनी स्वतःच्या प्रभावाचा वापर करून मोजणी अधिकारी जयदीप गाढे यांच्याकडून पूर्ववत रस्ता मोकळा दाखविण्यासाठी दिड लाखांची लाच मागितली.

सरळ सांगितले —
“काम करून देतो… पण दिड लाख रुपये लागतील!”

kamlakar

सरकारी पदाचा गैरवापर करत शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता ‘विक्रीस’ काढण्याचा हा प्रकार तक्रारदारांनी थेट लाचलुचपत विभागाकडे दिला.


धडाकेबाज सापळा – परदेशी रंगेहात जाळ्यात

लाचलुचपत विभागाने काटेकोर सापळा रचला.
4 डिसेंबर 2025 रोजी परदेशी यांनी तक्रारदाराकडून दिड लाखांची लाच स्वीकारताच
पंचांसमक्ष त्यांना हिरहिरीत नोटांसह रंगेहात पकडण्यात आले.

नेवासा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल.


कारवाई करणारे अधिकारी : कठोर पथकाची धडाडी

सापळा अधिकारी : PI राहुलकुमार नाईक, लाचलुचपत विभाग, नाशिक

पथक : पो.ह.वा. प्रफुल्ल माळी, पो.हा. विलास निकम, ना.पो.ह.वा. विनोद पवार

तपास अधिकारी : PI राजू आल्हाट, लाचलुचपत विभाग, अहिल्यानगर

वरिष्ठांचे मार्गदर्शन :
मा. श्री भारत तांगडे, SP, LCB नाशिक
मा. श्री माधव रेड्डी, अपर SP, नाशिक
मा. श्री सुनील दोरगे, अपर SP, नाशिक


नागरिकांसाठी कडक संदेश

या कारवाईने भूमिअभिलेख विभागातील वाढता भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारा अधिकारी तुरुंगात धाडण्यात आल्यामुळे नागरिकांनी लाच मागितल्यास निडरपणे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.


ही कारवाई नेवासा तालुक्यातील भूमिअभिलेखातील भ्रष्ट जाळ्याला जबरदस्त धक्का देणारी ठरली असून, शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याला मोठे यश मानले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button