Letest News
समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६ पुरस्काराने अशोकलाल (काका) लोढा यांचा गौरव मंगळसूत्र सापडले पण परत न करता खिशात टाकले-शिर्डीत चोरीचा गुन्हा दाखल
क्राईमराजकीय

दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृत्यू

शिर्डी : मन सुन्न करणारी आणखी एक वेदनादायक बातमी… समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात जितेंद्र शेळके यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नीनेही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. एका क्षणात संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला… आणि शिर्डी शहर शोकसागरात बुडाले आहे.
धोत्रे गावाजवळ झालेल्या त्या भीषण अपघाताने आधीच शेळके कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. कार कंटेनरखाली घुसल्याने झालेल्या धडकेत जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला होता. पत्नी गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत होत्या… पण अखेर ही लढाई त्या हरल्या.
💔 एका क्षणात संसार उद्ध्वस्त… मुलगा अजूनही मृत्यूशी झुंजतोय
या दुर्दैवी घटनेत त्यांचा मुलगा अजूनही गंभीर अवस्थेत असून संभाजीनगर येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आई-वडिलांचा आधार हरपलेल्या या लेकरासाठी संपूर्ण शिर्डी साई चरणी प्रार्थना करत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🙏 ज्यांनी आयुष्यभर इतरांसाठी जगलं… ते दोघंही आज नाहीत
जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नी — दोघंही माणुसकी जपणारे, साई भक्त आणि समाजासाठी झटणारे… आज दोघेही कायमचे निघून गेले. त्यांच्या जाण्याने फक्त एक कुटुंब नाही, तर संपूर्ण शहर पोरकं झालं आहे.
😢 शिर्डीत शोककळा — “देवाने खूप मोठं दुःख दिलं…”
ही बातमी समजताच शिर्डीत हळहळ व्यक्त होत आहे. “इतक्या चांगल्या माणसांवर असं का?” हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात असहाय वेदना…
🕯️ एक अपूर्ण कथा… दोन जीवांचा अंत…
एक प्रवास, एक कुटुंब, एक आनंदी संसार… आणि एका क्षणात सर्व काही संपलं.
ही जखम कधीही न भरून येणारी आहे…
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली…
“साई चरणी विलीन झालेल्या या दांपत्यास विनम्र अभिवादन…
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… आणि त्यांच्या मुलाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो…” 🕯️💔

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button