Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

शनिअमावस्ये निमित्त शनिशिंगणापूरला सुमारे चार लाख भाविकांनी घेतले शनी दर्शन! शिर्डीतही वाढली गर्दी!

शिर्डी (प्रतिनिधी) 30 नोव्हेंबर 2024 शनिवार रोजी शनि अमावस्या सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत ती असल्याने शनिवारी शनीअमावास्येनिमित्त शनिशिंगणापूर येथे श्री शनि महाराजांच्या दर्शनासाठी शनि भक्तांनी मोठी गर्दी केली होती. शनि अमावस्या निमित्त या दिवशी येथे 4 लाखाहून अधिक भाविकांनी शनिशिंगणापूर येथे येऊन शनिदेवाच्या दर्शन घेतले. शनिवारी रात्रभर व रविवारी ही शनिशिंगणापूर व शिर्डी येथे भक्तांची गर्दी दिसून येत होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शनिअमावास्या सुरू झाली तेव्हा सकाळी गर्दी अत्यल्प होती. त्यानंतर दुपारपासून भाविकांचा ओघ वाढला. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पार्किंग व्यवस्था मुळा कारखाना, घोडेगाव रोड, संभाजीनगर हायवे, कांगोणी रोड आदी ठिकाणी केली होती. दुपारपासून दर्शनरांगेत सुरू राहिलेली गर्दी सायंकाळपर्यंत टिकून होती. शिंगणापूरकडे येणार्‍या मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली होती.


पोलीस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी सकाळपासून शिंगणापूरात वाहनांची संख्या वाढत होती तरी वाहतूक कोंडी मात्र कुठेही दिसली नाही. शिंगणापुरातील मुख्य चौकासह शनिवारी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.

शनैश्वर देवस्थानच्या प्रसादालयात शनिवारी सायंकाळपर्यंत अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारीही भाविकांची अशीच गर्दी राहील, असा अंदाज आहे. शनिवारी सकाळची आरती माजी खासदार चंद्रकांत खैरे, दुपारची आरती जयेश शहा, तर सायंकाळी आरती उद्योगपती सौरभ बोरा, राहुल हेगडे यांच्या हस्ते करण्यात आली.


शनीअमावस्या यात्रेनिमित्ताने आ. शिवाजी कर्डिले, आ. विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर वैभव जोशी, मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे आदींनी शनिदेवाचे दर्शन घेतले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केलेली होती. मंदिर परिसरात भाविकांना ठिकठिकाणी पाणी व्यवस्था, भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.

शनिवारी रात्रभर शनिशिंगणापूर शनि भक्तांनी गजबजून गेल्याचे दिसून येत होते. शनिशिंगणापूर कडे जाणारे रस्ते तसेच शिर्डी शनिशिंगणापूर या रस्त्यावरही वाहनांची मोठी गर्दी दिसून येत होती. शनि महाराजांचे दर्शन घेऊन अनेक भक्त शिर्डीला साई दर्शनासाठी येत असल्यामुळे शिर्डीतही गर्दी वाढली होती. त्यात शनिवार व रविवारची सुट्टी असल्यामुळे शिर्डीतही साई दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली .

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button