Letest News
शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर पुण्यातील साईभक्त रामदास तापकीर यांनी अर्पण केला १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किंमतीचा ९० ग्रॅम सोन्याचा... शिर्डीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड चे टोकाचे पाऊल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्... उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये- नगर–मनमाड महामार्गाच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती‘ट्रंप तात्या डांबर देत ... राहता पोलिसांची दमदार कारवाई काल महिलेला लुटले आज चारही आरोपी ताब्यात! श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण
अ.नगरक्राईम

जाहीर निषेध —————————————–त्या घटनेला आज पूर्ण एक वर्ष झाल्याने आमच्या द्रुष्टीने आजचा हा काळा दिवस पीडित कुटुंब! आजच्या दिवशीच त्या ना-लायक अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून एका पत्रकार व त्याच्या परिवाराला केली होती मारहाण!

शिर्डी (प्रतिनिधी)
 न्यायहक्कासाठी लढत असणाऱ्या पत्रकाराला व त्यांच्या कुटुंबांतील पत्नी, तीन अल्पवयीन मुली यांना एक वर्षांपूर्वी 25 जानेवारी 2024 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक व  वीस ते पंचवीस पुरुष  पोलिसांनी  विनाकारण अमानुषपणे मारहाण केली होती. त्या संदर्भात पिडीतांनी भिंगार पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल केला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु त्या पोलीस अधीक्षकाने आपल्या पदाचा दुरुपयोग व दबाव आणून पीडितेचा गुन्हा दाखल करून घेतला नाही.   म्हुणुन पिडीतांनी नाईलाजास्तव न्यायालयात धाव घेऊन दावा दाखल केलेला आहे. आज शनिवार 25 जानेवारी 2025 असून या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. आमच्या दृष्टीने हा  काळा दिवस असून या घटनेचा आम्ही आजही निषेध करत आहोत. असे या पत्रकाराने व त्यांच्या कुटुंबाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


  या संदर्भात अधिक माहिती अशी की, 25 जानेवारी 2024 रोजी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात या घडलेल्या घटना संदर्भात पीडित पत्रकारांच्या कुटुंबाने घडलेल्या घटनेची दिनांक २७/०१/२०२४ रोजी  फिर्याद दिलेली होती.  या फिर्यादीत म्हटले होते की,मी लेखी लिहून देते कि, दिनांक २५/०१/२०२४ रोजी मी आणि माझे पती व आमच्या तिन्ही अल्पवयीन मुली माझे पती करत असलेल्या आमरण उपोषणाला नागपूर येथे जात होतो

जाण्याआधी पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे बोलावले म्हणून आम्ही अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो तेथे आम्ही सर्व बसलेलो असताना त्याठिकाणी एक पोलीस कर्मचारी आले त्यांनी आम्हाला सांगितले कि पोलीस अधीक्षक साहेब आले आहेत तुम्हाला खाली बोलावलं  म्हणून आम्ही खाली आलो आल्यानंतर  पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे जेथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते

त्या पार्किंग मध्ये उभे होते त्याठिकाणी माझ्या पतीचे आणि पोलीस अधीक्षक यांचे उपोषणाबाबत सकारात्मक चर्चा झाली व आम्ही नागपूर येथे निघत असतांना पार्किंग मध्ये जाऊन आमच्या गाडीत बसलो त्याठिकाणी  ३ पोलीस आले आणि त्यांनी माझ्या पतीला सांगितले कि पोलीस अधीक्षक साहेबांना तुमच्या सोबत बोलायचे आहे. म्हणून माझ्या पतीसह आम्ही गाडीच्या खाली उतरलो तेव्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक आहेर हे त्याच ठिकाणी पार्किंग मध्ये आमच्या पासून ५० फुटाच्या अंतरावर उभे होते

आम्ही त्यांच्याकडे पुढे जात असतांना पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक आहेर यांना आमच्या गाडीकडे पाठवले आणि पोलीस निरीक्षक यांनी माझ्या पतीला सांगितले कि तुम्ही एकटे आमच्या गाडीत बसा आम्ही तुम्हाला शिर्डीला सोडतो त्यावर माझे पती म्हणाले कि माझ्या सोबत माझी पत्नी व ३ लहान मुली आहेत ते एकटे कशे आपल्या घरी  येतील .त्यावर पोलीस निरीक्षक आहेर म्हणाले कि ते त्यांचं पाहातील तुम्ही चला आमच्या सोबत माझे पती यांनीं पोलीस निरीक्षक आहेर यांना सांगितले

कि माझ्या पती सोबत आम्हाला येऊ द्या त्यावर पोलीस निरीक्षक आहेर हे आम्हाला  आई बहिणी वरून घाणाघाण शिव्या द्यायला लागले आणि मागून पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक आहेर व तेथे उपस्थित असलेले २० ते २५ पुरुष पोलिसांना सांगितले कि यांना वाजून काढा व पोलीस अधीक्षक तेथून निघून गेले. तेथील पोलिसांनी व  पोलीस निरीक्षक आहेर  यांनी माझ्या पतीस मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी व माझ्या ३ मुली माझ्या पतीस सोडवायला गेलो असता त्या पोलिसांनी व पोलीस निरीक्षक आहेर यांनी मला व माझ्या मुलींनाही मारण्यास सुरुवात केली

व मला आणि मुलींना  नको ते घाणाघाण शिव्या देऊन मला व माझ्या मुलींना हात धरून पुरुष असलेल्या २० ते २५ पोलिसांनी ओढीत नेले  होते .ते सर्व पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी १२ ते १५ मिनटा पर्यन्त हे कृत्य करीत होते.  त्यानंतर त्यांनी आम्हाला हात धरून एका रूममध्ये घेऊन गेले व आमचे सर्वांचे मोबाईल हिसकावून घेतले. आणि खाली आपटले. त्यात आमचे दोन मोबाईल फुटून गेले आणि आमचे मोबाईल फॉर्मेट करून टाकले व माझ्या पतीची परवानाधारक  रिव्हॉल्वर बेकायदेशीर जप्त करून घेतली. म्हणून पोलीस अधीक्षक  यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक आहेर व त्या २० ते २५ पुरुष पोलीस मला त्यांचे नावे माहीत नाहीत

यांच्यावर मला केलेल्या मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल म्हणून  कृत्य केले व मारहाण केली म्हणून  विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा व माझ्या ३ अल्पवयीन मुलींना मारहाण करून लज्जा उत्पन्न असे कृत्य  केल्या प्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व माझ्या पतीस मारहाण केल्या प्रकरणी पत्रकार हल्ला विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद दिली होती. आज या घटनेला  एक वर्ष होत आहे.

कुंपणच शेत खात असेल तर जनता काय करणार.! जनतेच्या संरक्षणासाठी असणारे जनतेचे शोषण करत असेल, दडपशाही मारहाण करत असेल,तर जनता कोणाकडे दात मागणार? ज्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा ठेवावी ते जर अन्याय करत असेल तर या अन्याय करणाऱ्यांचा न्याय कोण करणार? असा सवाल त्यानिमित्ताने आज होत आहे. असे या पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button